आदर्की : गावचा कारभार कसा चालतो, विकासाची कामे दर्जेदार होतात का यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार ग्रामस्थांना ग्रामसभेच्या माध्यमातून मिळाले आहेत. पण ग्रामसभेकडे ग्रामस्थानी पाठफिरवली त्याबरोबर ग्रामपंचायत सदस्यांनीही ग्रामसभेकडे पाठ फिरवल्याचे चित्र फलटण तालुक्यात दिसत आहे.
सातारा जिल्हात कोरोना महामारी गेली दीड वर्षे गावच्या ग्रामसभा झाल्या नाहीत. त्यामुळे विकासाचे कामे रखडली आहेत. त्याबरोबर गावातील प्रत्येक वाॅर्डात समान विकासाची कामे पोहोचली पाहिजेत. म्हणून पाणीपुरवठा, स्वच्छता, वन व्यवस्थापन, शिक्षण, कृषी आदी समित्यांची नियुक्त्या झाल्या नव्हत्या.
त्यामुळे समित्याकडे शासनाकडून निधी खात्यावर जमा झाला होता. पण सचिव शासकीय असतो तर समितीचा अध्यक्ष गावातील सत्ताधारी गटाचा ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायत सदस्य असतो. त्यामुळे निधी खर्च करता येत नव्हता. काही शासकीय अधिकारी यांनी ग्रामसभाविनाच अध्यक्ष निधी खर्च केला. त्यानंतर शासनाने ऑनलाइन ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेतला. त्याला प्रतिसाद चांगला मिळत होता कारण बाहेरचे चाकरमानी, अधिकारी ग्रामसभेत सहभागी होऊन अभ्यास पूर्ण प्रश्नांमुळे प्रशासन व ऑफलाइन गाव पुढाऱ्यांची पंचायत होऊ लागली आहे. यामुळे बोगस ग्रामसभा बंद झाल्यामुळे व स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करण्यासाठी ग्रामस्थ जमत असत. त्यावेळी ग्रामस्थांच्या सह्या घेऊन ग्रामसभा दाखवून गाव पुढारी ग्रामस्थांच्या अज्ञानाचा फायदा घेत होते. सह्या झाल्याने अधिकारी कामांना मंजुरी देत होते. शासनाने स्वतंत्र सभा घेण्याचे आदेश काढल्याने ग्रामसभा घेणे क्रमपात्र झालेने ग्रामसभा घेतल्या पण ग्रामस्थांबरोबर ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवल्याने कोरमअभावी ग्रामसभा तहकूब झाल्याने उपस्थित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.