कुडाळ: ‘पिढी ही सुसंस्कारापासून बाजूला जात आहे. त्यांना चांगला संस्कार मिळावा आणि त्यांच्यात सुसंस्कार रुजावा यासाठी जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून सुलभा लोखंडे या लहान मुलांसाठी मोफत बालसंस्कार केंद्र चालवत आहेत. परिसरातील अनेक मुलांना याचा लाभ मिळत आहे. त्यांच्यात आदर, प्रेम, माणुसकी, आपुलकीची भावना रुजवली जात आहे. उद्याच्या सुजाण, सुसंस्कृत नागरिकत्वाची जडणघडण होण्यास याची नक्कीच मदत होणार आहे.
आजच्या पिढीपुढे चांगले आदर्श असायला हवेत. लहानपणापासूनच यांच्यात कृतज्ञता, सकारात्मक वृत्ती, मानवता, भूतदया आदी गुणसंपन्नता लाभली पाहिजे. या चिमुकल्यांना उद्याचा सुशिक्षितच नव्हे, तर सुसंस्कृत नागरिक बनवण्यासाठी जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून कुडाळनजीक बोराटेवस्ती याठिकाणी हे बालसंस्कार केंद्र सुरू आहे. अगदी लहानग्यांपासून ते १३ वर्षाच्या मुलांना या संस्कार केंद्रामध्ये सुसंस्काराचे धडे मिळत आहेत. अनेकदा आजच्या पिढीतला युवक वैफल्यग्रस्त झालेला दिसतो. याकरिता या स्पर्धेच्या जगात आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे, यासाठी योग्य संस्काराची शिदोरी येथे मिळत आहे. यामुळे यशाचे उत्तुंग शिखर गाठण्यासाठी बालवयातच त्याला आनंदी जीवन जागण्याचा मंत्र मिळत आहे.
फोटो : ०७कुडाळ
कुडाळ येथील बोराटे वस्तीवर बालसंस्कार केेंद्रात मोठ्या संख्येने मुले सहभागी होत आहेत. (छाया : विशाल जमदाडे)