शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
2
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
3
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
4
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
5
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
6
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
7
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
8
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
9
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
10
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
11
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
12
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
13
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
14
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
15
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
16
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
17
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
18
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
19
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
20
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: लाडक्या बहिणी रुसून बसल्या, सातारा जिल्ह्यात मतांचा टक्का घसरला

By सचिन काकडे | Updated: December 4, 2025 19:37 IST

महिला मतदारांची संख्या अधिक असतानाही मतदानातील उत्साह कमी

सचिन काकडे

सातारा : सातारा जिल्ह्यातील सात नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी मंगळवारी (दि. २) मतदान प्रक्रिया पार पडली. या पालिकांसाठी एकूण ६६.६९ टक्के मतदान झाले. निवडणुकीत यंदा महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असल्यामुळे महिलांची मते निर्णायक ठरतील, अशी मोठी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, मतदानाच्या आकडेवारीमध्ये याच्या उलट चित्र पाहायला मिळाले.जिल्ह्यात एकूण १ लाख ३२ हजार ३५५ पुरुषांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, तर महिला मतदारांची संख्या तुलनेने कमी म्हणजे १ लाख २५ हजार ११ इतकी राहिली. या मतदानावरून लाडक्या बहिणींनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले. महिलांचा मतदानाचा कल पुरुषांच्या तुलनेत कमी दिसून आल्याने, यंदा निवडणुकीचा अंतिम निकाल कसा लागतो, याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.

सातारा पालिकेसाठी सर्वात कमी मतदानजिल्ह्यात सातारा नगरपालिकेसाठी सर्वात कमी, म्हणजेच केवळ ५८.५४ टक्के इतके मतदान झाले. येथील एकूण १ लाख ४८ हजार ३०७ मतदारांपैकी ८६ हजार ८१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यातही महिला मतदारांचा उत्साह कमीच होता. पालिकेला ४४ हजार ७४२ पुरुष तर ४२ हजार ५६ महिलांनी मतदान केले.

मेढ्यात विक्रमी मतदानया निवडणुकीत, मेढा नगरपंचायतीसाठी सर्वाधिक ८४.२३ टक्के मतदान झाले, तर सातारा नगरपालिकेसाठी सर्वात कमी मतदान झाले. एकंदरीत, महिला मतदारांची अधिक संख्या असतानाही मतदानातील त्यांचा सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी राहिला.

मतदानाची टक्केवारी अशी

  • मेढा नगरपंचायत ८४.२३ (सर्वाधिक)
  • रहिमतपूर ८१.२०
  • म्हसवड ७९.८५
  • पाचगणी ७७.४५
  • वाई ७२.९८
  • कराड ६९.९१
  • मलकापूर ६८.०५
  • सातारा ५८.५४ (सर्वात कमी)

 

  • पुरुष मतदार - १,६८,४१०
  • महिला मतदार - १,७२,०१०
  • झालेले मतदान
  • पुरुष - १,३२,३५५
  • महिला - १,२५,०११

कोणत्या पालिकेत किती मतदानसातारामतदार १,४८,३०७मतदान ८६,८१२

कराडमतदार ६९,८३६मतदान ४८,८२४

वाईमतदार ३१,७६३मतदान २३,१८२

पाचगणीमतदार १०,२०१मतदान ७९०१

रहिमतपूरमतदार १५,७७०मतदान १२,८०६

म्हसवडमतदार २३,३५८मतदान १८,६५१

मलकापूरमतदान २५,१७४मतदार १७,१३२

मेढामतदार ४०२६मतदान ३३९१

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Local Elections: Female Voters Stay Away, Polling Percentage Drops

Web Summary : Satara district saw 66.69% voter turnout in local body elections. Despite higher female voter numbers, their participation lagged behind men. Satara municipality recorded the lowest turnout at 58.54%, while Medha Nagar Panchayat had the highest at 84.23%.