शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

Satara: पावसाची उघडीप; चार महिन्यांत नवजाला साडे पाच हजार मिलीमीटर पर्जन्यमान 

By नितीन काळेल | Updated: September 29, 2023 18:20 IST

कोयना धरणातील पाणीसाठा किती..जाणून घ्या

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडीप असली तरी चार महिन्यात नवजा येथे तब्बल साडे पाच हजार मिलीमीटरवर पर्जन्यमान झाले आहे. तर महाबळेश्वरच्या पावसानेही पाच हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे. कोयना परिसरात पाऊस कमी असून धरणातील पाणीसाठा ९२ टीएमसीच्यावर गेला आहे.जिल्ह्यात जूनपासून सप्टेंबरपर्यंतचे चार महिने पावसाळ्याचे समजले जातात. या महिन्यात पडणाऱ्या पावसावरच खरीप आणि रब्बी हंगामाचे गणित अवलंबून असते. तसेच पिण्याचे आणि शेती पाण्याचा प्रश्नही अवलंबून असतो. पण, यावर्षी पावसाने जिल्हावासीयांना दगा दिलेला आहे. यंदा आतापर्यंत तरी अपुरे पर्जन्यमान झालेले आहे. तर मान्सूनचा पाऊसही उशिरा दाखल झाला होता.जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोर धरला. त्यानंतर जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत धो-धो पाऊस कोसळत होता. यामुळे पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत झाले होते. तर अनेक मार्गावर दरडी कोसळल्या होत्या. पण, आॅगस्ट महिन्यात कमी पाऊस झाला. तसेच सप्टेंबर महिन्यात आतापर्यंतरी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नाही. त्यामुळे यंदा पाणीटंचाई भासण्याची चिन्हे आहेत.पश्चिम भागातच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी आणि कोयनासारखे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीवर आहे. यातील बलकवडी आणि तारळी ही धरणेच भरल्यात जमा आहेत. तर इतर धरणांत ६० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान पाणीसाठा झालेला आहे. आता पाऊस झाल्यास ही धरणे भरणार आहेत. अन्यथा धरणे भरणे शक्य नाही. त्यातच कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. पण, धरण भरण्यासाठी अजून १२ टीएमसीवर पाण्याची गरज आहे. तर उरमोडी धरणातून जिल्ह्याच्या पूर्व भागात सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. सध्या हे धरण ६० टक्केही भरलेले नाही. त्यामुळे अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे.

कोयनेला ३९२८ मिलीमीटर पाऊस..जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस होतो. याकाळात पश्चिमेकडील कोयनानगर, नवजा, तापोळा, महाबळेश्वर या भागात तुफान वृष्टी होते. त्यामुळे येथील पाऊस पाच-सहा हजार मिलीमीटरचा टप्पा पार करतो. या भागात आतापर्यंतच्या चार महिन्यात नवजाला सर्वाधिक ५५५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यानंतर महाबळेश्वरला ५३४७ मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगरला कमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत ३९२८ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. तर कोयना धरणात शुक्रवारी सकाळच्या सुमारास ९२.५९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील आवक एकदम कमी झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण