शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कोयनानगर परिसरात आढळला बिबट्याचा सांगाडा, वन्यजीव विभागासमोर मृत कारण शोधण्याचे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 19:39 IST

कोयनानगर : कोयना भागातील गाढखोप गावातील मालकी क्षेत्रात नर जातीच्या बिबट्याचा सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याची नेमकी शिकार करण्यात आली की ...

कोयनानगर : कोयना भागातील गाढखोप गावातील मालकी क्षेत्रात नर जातीच्या बिबट्याचा सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याची नेमकी शिकार करण्यात आली की नैसर्गिक मृत्यू झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र, वन्यजीव विभागासमोर मृत कारण शोधण्याचे आव्हान असणार आहे. याबाबत वन्यजीव विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, काल, बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाईड लाईफ इंस्ट्युट ऑफ इंडियाचे प्रशिक्षणार्थी  गाढखोप बाजे गावाच्या दरम्यान सामाजिक सर्व्हक्षण करत होते. यावेळी रानात बिबट्याचा अर्धवट सडलेल्या अवस्थेतील सांगाडा आढळला. 

याबाबतची माहिती त्यांनी संबंधिताना दिली असता हेळवाक वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल संदिप जोपळे, सह्यायक वनसंरक्षक तुषार ढमढेरे यांनी रात्री घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या परिसरात वन कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता संशयास्पद काही आढळले नाही. दरम्यान वनकर्मचाऱ्यांनी  रात्रभर पहारा दिला. आज,गुरूवारी सकाळी पुन्हा शोध  मोहीम सुरू केली मात्र मृत्यूचे कारण समजु शकले नाही. 

अंदाजे 10 ते15 दिवसापूर्वी जुने सडलेल्या अवस्थेत मृत बिबट्यास भटक्या कुत्र्यांनी ओडून शेता कडेला आणून खाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदर मृत बिबट्याचा तातडीने पंचनामा केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी वाकतकर यांनी शविच्छेदन केले. यानंतर जागेवर बिबट्याचे दहन करण्यात आले. यावेळी घटनास्थळी मानद वन्यजीव रक्षक सुनिल भोईटे, महेश शेलार, स्थानिक गावचे  पोलीस पाटील सागर जाधव, संग्राम कांबळे व गाढखोपचे सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.मृत बिबट्याची सर्व पायांची नखे सुळके व दात हे सुस्थितीत असुन कातडे हे सडलेले अवस्थेत  होते. पुढील तपास हेळवाकचे वनक्षेत्रपाल संदीप जोपळे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर