शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अबब...शामगाव घाटात बिबट्याचे दर्शन, युवकांच्या वाहनासमोरून ठोकली धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 20:28 IST

मोबाईल शूटिंग करताना बिबट्या मोबाईल मध्ये कैद झाला.

राजीव पिसाळ

पुसेसावळी : शामगाव ता . कर्‍हाड येथील रहदारीच्या शामगाव घाटात वडूज, निमसोड व शितोळे नगर मधील युवकांच्या मोटारसायकल समोरून बिबट्याने जोरदार धूम ठोकली. शामगाव घाटातील आल्हाददायक पावसाळी वातावरणाचा आनंद घेत मोबाईल शूटिंग करताना बिबट्या मोबाईल मध्ये कैद झाला. अचानक मोटारसायकलला आडवा आलेल्या बिबट्यामुळे त्याच्या दर्शनाने आनंद ही वाटला व भितीही वाटली असल्याचा सुखद वृत्तांत दिवसभर सोशल मीडीयावर सुरू होता.

खटाव तालुक्यातील विजय शिंदे तसेच निमसोड व शितोळे नगर मधील युवक व त्याचे मित्र कर्‍हाडहून वडूजकडे निघाले होते. त्यावेळी जोरदार पाऊस पडून गेला होता व पावसाची बारीक रिपरिप सुरू होती. अशा अल्हाददायी निसर्गरम्य दृश्याचे त्यांच्याकडून मोबाईलवर चित्रीकरण चालू होते. एवढ्यात शामगाव घाटातील डोंगर कपारीतून एक मोठा बिबट्या बाईक समोरून डोळ्यांची पापणी लवायच्या आत जोरात पळत गेला.

त्यावेळी गाडी चालवणाराचा हृदयाचा ठोका चुकला व भितीने गाळण उडाली. त्याने जर गाडीवर झेप घेतली असती तर काय झाले असते याची भितीही काहीक्षण थरकाप उडवून गेली होती. पण एवढ्या जवळून बिबट्या  बघायला मिळाले याचा आनंद सुद्धा होता. दिवसा ढवळ्या बिबट्याच्या दर्शनाने एकटे - दुकटे जाणाऱ्या लोकांनी खबरदारी घेण्याची गरज असल्याच्या चर्चेला देखील उधाण आले होते.

आजपर्यंत सर्कशीमध्येच पाहिलेले वाघ, सिंह, बिबट्या आज प्रत्यक्षदर्शींनी दिसला. याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मित्रांची चौकशी इतर मित्रांकडून दिवसभर सुरू होती. तर निसर्गाच्या सानिध्यातच हे प्राणी पाहयला छान वाटतात अश्या बोलक्या प्रतिक्रिया ही एका वेगळ्या विश्वात नेहत होत्या.

टॅग्स :leopardबिबट्या