शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: वराडे गावात बिबट्याचा धुमाकूळ, पुन्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाला कैद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 15:51 IST

अजय जाधव उंब्रज: कऱ्हाड तालुक्यातील वराडे गावात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ...

अजय जाधवउंब्रज: कऱ्हाड तालुक्यातील वराडे गावात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वराडेत यापूर्वीच तब्बल तीन बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने याआधीच गावातील अनेक पाळीव कुत्री फस्त केली आहेत. अनेक महिन्यांपासून येथील डोंगर परिसरात बिबट्यांचा वावर आहे. मात्र आता बिबटे लोक वस्तीत बिनधास्त वावरू लागले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.       वन विभागाचे स्वतंत्र कार्यालय वराडे येथे आहे. मात्र बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नाहीत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून शिवारातील कामे खोळंबली आहेत. महिन्यांपूर्वी एका दुचाकीस्वारांचा बिबट्याने पाठलाग केला. तसेच एका युवकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. ऐन गणेशोत्सवात चारच दिवसांपुर्वी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास गावात बिबट्या शिरला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी आरडाओरडा केला. दरम्यान वराडे ग्रामपंचायतीनेही या संदर्भात वनविभागाकडे पत्रव्यवहार करुन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.गावात पिंजरे लावण्याची मागणी तीन वर्षांपूर्वी वराडे येथे डोंगर पायथ्याशी बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. मात्र बिबट्याने हुलकावणी दिली. दरम्यान मागील काही दिवसापासून पुन्हा बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांच्या घबराटीचे वातावरण आहे. गावात पुन्हा पिंजरे लावण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्याforest departmentवनविभाग