बामणोली : कोयना अभयारण्यातंर्गत येणाºया सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन क्षेत्रात वलवण, ता . महाबळेश्वर गावच्या हद्दीत बिबट्या मृताअवस्थेत आढळून आला. याबाबत अधिक माहिती अशी, शिंदी, वलवण परिसरात काम करणाºया वनविभागाच्या मजूरांना शुक्रवार दुपारी एक बिबट्या मृतावस्थेत दिसला. त्यानंतर त्यांनी अधिकाºयांना याची माहिती दिली. अधिकाºयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता या बिबट्याचा दहा ते बारा दिवसांपूर्वी मृत्यू झाला असण्याचे त्यांनी सांगितले. बिबट्या पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. बामणोली येथील कार्यालयातील अधिकाºयांनी मृत बिबट्याचा पंचनामा केला आहे.
कोयना अभयारण्यात बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 11:54 IST