शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मळेवाडमध्ये जेरबंद केलेला बिबट्या सातारला हलविला, वन्यप्राणी केंद्रात उपचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:09 IST

बिबट्या हिंसक बनल्याने खबरदारी

सातारा/सावंतवाडी : मळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चौघा ग्रामस्थांवर हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या बिबट्याला मंगळवारी पहाटे सातारा येथे हलविण्यात आले. तेथील वन्यप्राणी उपचार केंद्रात त्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. बिबट्याच्या पायात फासके अडकल्याने मागील पायाला दुखापत झाली होती. त्यावर उपचार करण्यात आले. हा बिबट्या हिंसक बनल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढली होती.मळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथे भरवस्तीत शिरून बिबट्याने चौघांवर हल्ला केला होता. या बिबट्याला उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुहास पाटील, आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप, मळगाव वनपाल प्रमोद राणे, आजगाव, बांदा, मळगाव, माजगाव वन परिमंडळातील वनकर्मचारी तसेच कुडाळ आणि सावंतवाडी येथील जलद कृती दलाचे कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यात कैद केले होते. संपूर्ण वाढ झालेली आठ ते दहा वर्षे वयाचा हा बिबट्या आहे.

उपाशी असल्याचे अस्वस्थबिबट्याला ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तो उपाशी असल्याने अस्वस्थ असल्याचे तसेच अंगावर काही जखमा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बिबट्याला सातारा येथील वन्य प्राणी उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर डॉ. निखिल बनकर यांनी उपचार करून केले. उपचारानंतर बिबट्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

जखमींना वनविभागाकडून मदत देण्यात येणारबिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मळेवाड येथील चारही ग्रामस्थांना वनविभागाकडून मदत देण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून लवकरच ही मदत देण्यात येणार आहे, तसेच जखमींची प्रकृती सुधारत असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.