शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

साताऱ्यात बिबट्या थेट घरातच घुसला, कुत्र्याने भुंकताच पळत सुटला

By महेश गलांडे | Updated: December 23, 2020 15:18 IST

सातारा जिल्ह्यातही मंगळवारी रात्री बिबट्या आढळून आला, हा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या बिबट्याने चक्क घरातच प्रवेश केला होता, सुदैवाने कुणीही मनुष्य तेथे नसल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातही मंगळवारी रात्री बिबट्या आढळून आला, हा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या बिबट्याने चक्क घरातच प्रवेश केला होता, सुदैवाने कुणीही मनुष्य तेथे नसल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही.

सातारा - राज्यातील अनेक भागांता गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत पसरली आहे. त्यातच, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील बिबट्याने तब्बल 9 बळी घेतल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. अखेर, या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वनविभागाला यश आले आहे. करमाळ्यातील बिटरगाव-वांगी परिसरात बिबट्याला ठार करण्यात आले. तीन बाजूला पाणी आणि एका बाजूला शूटर थांबवून बिबट्याची कोंडी करण्यात आली. त्यामुळे बिबट्याला दुसरीकडे जाणे शक्य नव्हते. या परिस्थितीत शूटरने बिबट्याला ठार केले, त्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला. मात्र, अद्यापही बिबट्याची दहशत कायम आहे. 

सातारा जिल्ह्यातही मंगळवारी रात्री बिबट्या आढळून आला, हा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या बिबट्याने चक्क घरातच प्रवेश केला होता, सुदैवाने कुणीही मनुष्य तेथे नसल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही. मात्र, बिबट्याच्या गृहप्रवेशाची चर्चा गावात चांगलीच रंगली आहे. कराडजवळील काले गावात बिबट्या अगदी घरातच घुसल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. रात्रीच्या अंधारात अलगदपणे बिबट्या पायऱ्या चढून घरात शिरला. बिबट्याला पाहताच दाराबाहेर असलेल्या कुत्र्याने भुंकण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी, बिबट्या एकटक नजरेने कुत्र्यावर निशाणा रोखून होता. पण, कुत्र्याने पुढे येऊन भुंकण्यास सुरुवात केल्यानंतर बिबट्याने घरातून बाहेरच्या दिशेने धूम ठोकली. घराबाहेरील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे.  त्यामुळे, गाव-परिसरात या बिबट्याची चांगलीच दहशत बसली आहे. स्थानिक प्रशासन आणि वन विभागाला सतर्क करण्यात आले असून बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, करमाळ्यात नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आले, तरीही गावकऱ्यांमध्ये दहशत कायम आहे.  

करमाळ्यात ठार केलेला बिबट्या नरभक्षक

येथे ठार करण्यात आलेला बिबट्या हा नर होता. त्याची पूर्ण वाढ झालेली असून, वय अंदाजे सहा ते सात वर्षे इतके होते. त्याची शेपटीसह लांबीही सहा फूट इतकी होती. बिबट्याविषयी खूप अफवा पसरल्या आहेत. तीन डिसेंबरपासून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. ज्या परिसरात त्याला ठार केले त्याच परिसरात त्याने काही दिवसांपूर्वी हल्ला केला होता. त्याच्याविषयीच्या माहितीचे अ‍ॅनालिसिस करण्यात आले. त्याच्या पायांच्या ठशांमुळे (पगमार्क) नरभक्षक असलेला बिबट्या हा तोच असल्याचे सिद्ध झाले. रोज सरासरी आठ किलोमीटर तो प्रवास करत होता. सोलापुरातील केळी व उसाच्या शेतात आल्यावर तो घुटमळला, त्यामुळे तो फक्त एक ते दीड किलोमीटर फिरत होता. 

टॅग्स :leopardबिबट्याSatara areaसातारा परिसर