शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

वसंतगडाच्या पायथ्याला बिबट्याची शिकार!

By admin | Updated: November 24, 2015 00:20 IST

‘लोकमत’मुळे प्रकार उघड : मृतदेहाचा पंजा, शेपूट, दात गायब; वनविभाग हादरला

कऱ्हाड : वसंतगड येथे बिबट्याची शिकार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी ‘लोकमत’ने उघडकीस आणला. शिकाऱ्यांनी बिबट्याला ठार मारून त्याचे पंजे, शेपूट तसेच दात गायब केले आहेत. उर्वरित मृतदेह त्यांनी डोंगराच्या पायथ्याला एका ओघळीत टाकला असून, तस्करीच्या उद्देशाने हा प्रकार झाल्याचा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे. कऱ्हाड तालुक्यातील वसंतगडाच्या पायथ्याला दाट झाडी आहे. तसेच या दाट झाडीत अनेक ओघळ व ओढेही आहेत. सध्या हे ओढे व ओघळ कोरडे असून, पानगळ झाल्यामुळे वाळलेल्या पानांचा खचही पडला आहे. अशातच वसंतगड गावठाणापासून गडाच्या पायथ्याला जाणाऱ्या मार्गाशेजारील ओघळीत मृत बिबट्या पडल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. ही घटना समजल्यानंतर ‘लोकमत’ने त्याचा पाठपुरावा केला. प्रतिनिधींनी स्वत: घटनास्थळी जाऊन खात्री केली. त्यावेळी १५ ते २० फूट खोल ओघळीत झाडाच्या बुंध्याजवळ मृत बिबट्या पडल्याचे दिसून आले. मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांना ही माहिती दिल्यानंतर ते सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. संबंधित बिबट्याचे पंजे, शेपूट व दात गायब असल्याने त्याची शिकार करण्यात आली असावी, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. त्यानंतर हा प्रकार वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आला. वनरक्षक जगदीश मोहिते, विक्रम निकम, दादाराव बर्गे, वनपाल आनंदराव येळवे व संतोष जाधवर यांनी तातडीने त्याठिकाणी भेट दिली. त्यांनीही मृत बिबट्याची पाहणी केली. त्याची शिकार करण्यात आली असण्याची दाट शक्यता वनाधिकाऱ्यांनीही व्यक्त केली. त्यानुसार बिबट्याचे इतर अवयव आसपास पडले आहेत का, याची खातरजमा करण्यासाठी ओघळीत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, त्याठिकाणी इतर कोणतेही अवयव आढळून आले नाहीत. शिकाऱ्यांच्या शोधासाठी वनविभागाने श्वान पथकाला पाचारण केले होते. (पान ९ वर)‘रितू’ श्वान घुटमळलेघटनास्थळापासून काही अंतरावर लोकवस्त्या आहेत. तसेच घटनास्थळापर्यंत चारचाकीचा मार्गही आहे. त्यामुळे शिकाऱ्यांना शोधण्यासाठी इस्लामपूरच्या ‘रितू’ या श्वानाला पाचारण करण्यात आले होते. या श्वानाला घटनास्थळी वास देण्यात आला. त्यानंतर श्वान सुमारे पाचशे मीटर अंतरावर गेले. त्या ठिकाणी बिबट्याची काही हाडे सापडली. आणखी काही अंतरावर जाऊन श्वान घुटमळले. या श्वानाला खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. या श्वानाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत माग काढला. त्यानंतर श्वान घुटमळले. त्यामुळे बिबट्याचा मृतदेह एखाद्या वाहनातून आणून येथे टाकण्यात आला असावा व शिकारी त्याच वाहनानेच तेथून पसार झाले असावेत, अशी शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा सहायक वनसंरक्षक विनायक मुळे, वनक्षेत्रपाल बाबा शिंदे यांनी त्या ठिकाणी भेट दिली. त्यांच्यासमक्ष घटनास्थळाचा पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह वनविभागाने ताब्यात घेतला.जागीच शवविच्छेदन, अंत्यसंस्कारमृतावस्थेत आढळलेला बिबट्या नर असून, तो सहा ते सात वर्षांचा पूर्ण वाढ झालेला आहे. सुमारे वीस दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. मृतदेह पूर्णपणे सडला असल्यामुळे त्याच ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा जबडा पूर्णपणे तोडून नेला असल्याचे त्यावेळी दिसून आले. मात्र, त्याची शिकार झाली की नैसर्गिक मृत्यू, याबाबत वन व वन्यजीवचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत साशंक होते. घटनास्थळापासून काही अंतरावर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)‘रितू’ श्वान घुटमळलेघटनास्थळापासून काही अंतरावर लोकवस्त्या आहेत. तसेच घटनास्थळापर्यंत चारचाकीचा मार्गही आहे. त्यामुळे शिकाऱ्यांना शोधण्यासाठी इस्लामपूरच्या ‘रितू’ या श्वानाला पाचारण करण्यात आले होते. या श्वानाला घटनास्थळी वास देण्यात आला. त्यानंतर श्वान सुमारे पाचशे मीटर अंतरावर गेले. त्या ठिकाणी बिबट्याची काही हाडे सापडली. आणखी काही अंतरावर जाऊन श्वान घुटमळले. या श्वानाला खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.