मसूर ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत कर वसुलीसाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही सहभाग घ्यावा, असे सर्वानुमते ठरले होते. त्याप्रमाणे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या करदात्यांना कर भरण्याबाबत आवाहन केले. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत ग्रामपंचायतीच्या खातेदारांनी सुमारे दीड लाख रुपयांचा भरणा एकाच दिवसात केला. सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी, ग्रामपंचायत सदस्य संग्रामसिंह जगदाळे, संजय शिरतोडे, रमेश जाधव, प्रमोद चव्हाण, सुनील जगदाळे, अक्षय कोरे, कैलास कांबळे, वसंत पाटोळे, श्याम पार्लेकर, विकास पाटोळे, फैजल मोमीन, अमोल यादव, सचिन साळुंखे, ग्रामपंचायत कर्मचारी संदीप चिकणे, धीरज जगदाळे, लहू मोरे, गणेश कांबळे, भीमराव कांबळे, उमेश वायदंडे यांनी सहभाग घेतला होता.
फोटो : ०७केआरडी०३
कॅप्शन : मसूर येथे ग्रामपंचायतीच्या करवसुलीमध्ये सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी आदी सहभागी झाले होते.