शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

स्मार्ट डिजिटल वर्गामधून मुलांना हसत खेळत शिक्षण : हत्तीखाना शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 23:35 IST

नितीन काळेल ।सातारा : सध्याच्या स्पर्धेच्या युगात अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय (हत्तीखाना) अग्रेसर ठरत आहे. स्मार्ट डिजिटल वर्गामधून मुलांना हसत खेळत शिक्षण मिळत आहे. विशेष म्हणजे बालसाहित्य संमेलनाबरोबरच विविध उपक्रमही शाळेत दरवर्षी होत असतात.सातारा एज्युकेशन सोसायटीची अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय ही शाळा सर्व स्तरात आघाडीवर आहे. स्पर्धेच्या युगात ही शाळा ...

ठळक मुद्दे-माझी शाळा....माझा उपक्रम स्मार्ट शाळेबरोबरच विद्यार्थीही गुणवत्ताधारक; बालसाहित्य संमेलनाचेही आयोजन-

नितीन काळेल ।सातारा : सध्याच्या स्पर्धेच्या युगात अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय (हत्तीखाना) अग्रेसर ठरत आहे. स्मार्ट डिजिटल वर्गामधून मुलांना हसत खेळत शिक्षण मिळत आहे. विशेष म्हणजे बालसाहित्य संमेलनाबरोबरच विविध उपक्रमही शाळेत दरवर्षी होत असतात.सातारा एज्युकेशन सोसायटीची अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय ही शाळा सर्व स्तरात आघाडीवर आहे. स्पर्धेच्या युगात ही शाळा गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जा कायम टिकवून आहे.

या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. तर या वर्गांच्या तब्बल २४ तुकड्या आहेत. त्यामुळे शेकडो विद्यार्थी या शाळेत ज्ञानार्जन आनंदाने घेत असताना दिसत असतात. शाळेतील अध्यापक वर्ग हा हुशार असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यास सदैव तयार असतो.या शाळेत गेल्या ४० वर्षांपासून साने गुरुजी कथामाला सुरू आहे. संस्थेच्या चेअरमन डॉ. चेतना माजगावकर, सचिव सी. एन. शहा, सहसचिव डॉ. दीपक ताटपुजे, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचे शाळेकडे नेहमीच लक्ष असते. शालाप्रमुख जयश्री उबाळे, उपशालाप्रमुख अजित साळुंखे व सर्व शिक्षकांचे नेहमीच सहकार्य लाभत असते.''ऐतिहासिक वास्तूमध्ये भरते शाळा...१९३७ पासून आजपर्यंत ऐतिहासिक वास्तूमध्ये ही शाळा भरत आहे. संस्थेने या शाळेला १९९० मध्ये तीन मजली इमारत बांधून दिली आहे. या इमारतींमध्ये शेकडो मुलांचे ज्ञानार्जन सुरू असते.विविध सण साजरे...शाळा विविध उपक्रम घेते तसेच सणही साजरे करण्यात येतात. रक्षाबंधन, गुरुपौर्णिमा, गणेशोत्सव साजरा होतो. तसेच विविध प्रकारचे खेळ, योगासने, सहलींचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे शाळेत ब्रिटिश कौन्सिल इंग्रजीचे क्लासही घेतले जातात. 

सातारा एज्युकेशन सोसायटीच्या या शाळेला मोठा इतिहास आहे. आज या शाळेत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील अनेक विद्यार्थी देश, परदेशात मोठमोठ्या पदावर कार्यरत असून, शाळा नेहमीच प्रगतीपथावर राहिली आहे.-जयश्री उबाळे, शालाप्रमुख

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSchoolशाळा