कऱ्हाड : ‘लोकमत सखी मंच २०१५’ ची विक्रमी सदस्य नोंदणी झाली. या सदस्यांसाठी नवीन वर्षातील धमाकेदार नजराणा म्हणजेच ‘लावणी महोत्सव’ शुक्रवार, दि. २० मार्च २०१५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पटेल लॉन, वाखाण रोड कऱ्हाड येथे नृत्यांगणा चैत्रालीराजे यांचा ‘लावणी महोत्सव’ आयोजित केला आहे. या लावणी महोत्सवादरम्यान अनेक बहारदार लावण्यांचे सादरीकरण केले जाणार आहे. या लावणी महोत्सवातून सखींसाठी आकर्षक लावण्यांची मेजवानी सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमातही लकी ड्रॉमधून आकर्षक बक्षिसे सखींना जिंकता येणार आहेत. कऱ्हाडच्या सखींसाठी तीन भाग्यवान सखींना आनंद कृषी पर्यटन केंद्राची शिवार सहल मोफत मिळणार आहे. एका भाग्यवान सखीला स्वर्ग ज्वेलर्स यांच्यातर्फे तीन हजार रुपये किमतीच्या बँगल्स मोफत मिळणार आहेत. या वर्षातील सर्व सखी सभासदांना मिसळ हाउसतर्फे मिसळ मोफत मिळणार आहे. निर्मल ट्रेडर्स यांच्या तर्फे २५ रुपये किमतीची अगरबत्ती मोफत मिळणार आहे. लकी ड्रॉचे कूपन जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. लकी ड्रॉ साठी ती संपूर्ण जाहिरात कट करून घेऊन येणे आवश्यक आहे. अधिकाधिक सखींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लावणी पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सखी मंच तर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) या कार्यक्रमासाठी २०१५ चे सखी मंचचे ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच कार्यक्रमस्थळी सभासद नोंदणी केली जाणार नाही, याची सखींनी नोंद घ्यावी.
कऱ्हाडला शुक्रवारी लावणी महोत्सव
By admin | Updated: March 17, 2015 00:12 IST