वाई : प्राचीन काळापासून ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा लाभलेल्या वाईनगरीला उत्सवाची परंपरा आहे. ती जपण्याचे आजही प्रयत्न केले जात आहे. ‘वाई फेस्टिव्हल’ला चित्रकला स्पर्धेने रविवारी प्रारंभ झाला.‘वाई फेस्टिव्हल’चे हे सातवे वर्ष असून, ‘लोकमत’ हे याचे माध्यम प्रायोजक आहे. रविवारी सकाळी आठ वाजता महागणपती घाटावर शहर तसेच परिसरातील सर्व शाळांमधील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. बालचित्रकलेचे उद्घाटन सुरेखा यादव यांच्या हस्ते करण्यात आले.फेस्टिव्हलचे निमंत्रक आनंद कोल्हापुरे यांनी प्रास्ताविकात संपूर्ण रूपरेखा सांगितली. अध्यक्ष सुनील शिंदे, रोटरी क्लबचे अध्यक्षा सोनाली शिंदे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष भूषण गायकवाड, नवीनभाई परांडे, नितीन कदम, मदनकुमार साळवेकर, अलका मुरुमकर, राजेंद्र धुमाळ, विजयसिंह नायकवडी, सुनील देशपांडे, नगरसेविका अनुराधा कोल्हापुरे, प्रकाश देशमुख उपस्थित होते.फेस्टिव्हलमध्ये सायकल रॅली, महिला बचतगटांना चालना व प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री, नृत्य संगीत कार्यक्रम, रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा, विनोदी कार्यक्रम, एकेरी व समूह नृत्य स्पर्धा, उत्कर्ष श्री शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)लहानग्यांचा सहभागसकाळच्या प्रसन्न वातावरण, कोवळे ऊन अंगावर घेत महागणपती घाटावर लहान मुलांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. चित्रकला स्पर्धेत सहभागी मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुलांबरोबर पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘वाई फेस्टिव्हल’ला प्रारंभ
By admin | Updated: December 16, 2014 00:18 IST