शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

दोस्तीमुळे गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य...

By admin | Updated: July 6, 2017 13:08 IST

डिस्कळ येथे उपक्रम : आपलं नातं आपुलकीचं ब्रिदवाक्याला अनुसरून ग्रुपचे काम

आॅनलाईन लोकमतबुध (जि. सातारा), दि. ५ : डिस्कळ, ता. खटाव येथील दोस्ती ग्रुप म्हणजेच दोस्ती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ. हे मंडळ नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते. आपलं नातं मैत्रीचं, आपुलकीचं अन सामाजिक बांधीलकीचं या ब्रीद वाक्याला नेहमीच अनुसरून ग्रुपने अनेक कामे आत्तापर्यंत डिस्कळ पंचक्रोशीमध्ये केलेली आहेत. नुकतेच या ग्रुपने डिस्कळमध्ये गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. सध्या सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. विद्याथीर्ही वेळेवर शाळेत जाऊ लागले आहेत. शाळेकरीता कोणी नवीन सॅक घेतलीय, तर कोणी पावसाळ्याकरीता जर्कीन व रेनकोट तर कोणी रंगीबेरंगी छत्री घेतली आहे. हे सर्व ज्यांची परिस्थिती चांगली आहे अशा पालकांनी आपल्या पाल्यासाठी नक्कीच खरेदी केली आहे. पण ज्यांच्या रोजच्या रोजी रोटीचा प्रश्न असतो. ते पालक कसे काय या सर्व गोष्टी खरेदी करू शकणार? ते तर आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक गरजाही व्यवस्थित पूर्ण करू शकत नाहीत. तर अशा हौस, मौजेच्या गोष्टी तर दूरच राहातात. म्हणून त्यांची मुले अभ्यासात कुठे कमी आहेत का? नक्कीच नाही. उलट त्यांची मुले ही शाळेत जिद्दीने व मेहनतीने पुढे जात असतात. परंतू त्यांना काही मूलभूत गोष्टींची कमी ही भासतच राहते. याच गोष्टीचा विचार करून दोस्ती ग्रुपने शालेय गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यारुपी मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार डिस्कळ येथील श्री. शिवाजी विद्यालयातील ५ वी ते ७ वीमधील प्रत्येक वगार्तील ५ मुली व ५ मुले याप्रमाणे ६० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ वह्या देण्यात आल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १ ली ते ४ थी मधीलही प्रत्येक वगार्तील ५ मुली व ५ मुले याप्रमाणे ४० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ वह्यांचे वाटप दोस्ती ग्रुपच्या सदस्यांच्या तसेच शाळेतील सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर अक्षदा गणपतराव काटकर हिचा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास दोस्ती ग्रुपचे सर्व पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्या किर्ती सूर्यवंशी, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार...

दोस्ती ग्रुपने केलेल्या मदतीचा लाभ १०० शालेय विद्यार्थ्यांना झाला असून, याचा त्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. त्यांना यानिमित्ताने अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत जातील हीच अपेक्षा व्यक्त होत होती.