शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सापडलेले दहा तोळे सोने केले युवकाने परत, सर्वत्र कौतुक : अपघातानंतर हरवली होती बॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:18 IST

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणुसकी लोप पावत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, सातारा तालुक्यातील नागेवाडीतील युवक याला अपवाद ठरला आहे.

ठळक मुद्देसापडलेले दहा तोळे सोने केले युवकाने परतसर्वत्र कौतुक : अपघातानंतर हरवली होती बॅग

सातारा : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणुसकी लोप पावत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, सातारा तालुक्यातील नागेवाडीतील युवक याला अपवाद ठरला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, नवी मुंबई येथे वास्तव्यास असणारे महमूद शेख हे दोन दिवसांपूर्वी कारने मुंबईहून साताऱ्यात येत होते. नागेवाडी फाट्यावर आल्यानंतर त्यांच्या कारला अपघात झाला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्यासोबत असलेली बॅग अज्ञाताने पळवून नेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी ही नागेवाडी फाट्यापासून काही अंतरावर महादेव नाटेकर (वय २४, रा. नागेवाडी, ता. सातारा) याला सापडली. या युवकाने बॅग उघडून पाहिली असता बॅगमध्ये दहा तोळे सोन्याचे दागिने, एटीएम, पॅनकार्ड आदी कागदपत्रे होती. त्या बॅगेत असलेला मोबाईल बंद होता. घरी जाऊन त्याने तो मोबाईल सुरू केला. त्यानंतर त्या मोबाईलवर आलेल्या फोनवरून त्याने माय मॉम या नावाने सेव्ह असलेल्या फोन नंबरवर कॉल केला.

त्यावेळी महमूद शेख याच्या आईने माझ्या मुलाचा साताऱ्याजवळ अपघात झाला असून, त्याची बॅग हरवली आहे. त्यावेळी महादेव नाटेकर याने तुम्ही काळजी करू नका, तुमची बॅग माझ्याजवळ आहे. बॅगमधील सर्व दागिनेही सुरक्षित आहेत, असे सांगितले. तेव्हा कुठे महमूद शेख यांच्या आईचा जीव भांड्यात पडला.महादेव नाटेकरने बॅग सापडल्याची माहिती पोलीस पाटील अविनाश भोसले यांना सांगितली. त्यानंतर ते नाटेकरसह सातारा तालुका पोलीस ठाण्यात आले. हवालदार राजू मुलाणी, हवालदार आक्रम मेटकरी यांच्या समक्ष ओळख पटल्यानंतर महमूद शेख याला दागिने असलेली बॅग परत केली. यावेळी सर्व पोलिसांनी महादेव नाटेकरचे कौतुक केले. महादेवच्या रुपाने आजही समाजात माणुसकी टिकून असल्याचे पोलिसांनी बोलून दाखविले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस