शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भूमापक अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, कऱ्हाड येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 18:55 IST

तीन भूखंड एकत्रित करण्यासाठी कऱ्हाड  येथील भूमिअभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक अधिकारी आनंदराव विठ्ठल माने ( ३५, मूळ रा. निढवळ. पो वडूज, ता. खटाव) याला १३ हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली.

ठळक मुद्देभूमापक अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, कऱ्हाड येथील घटनातीन भूखंड एकत्रित करण्यासाठी स्वीकारले १३ हजार

सातारा : तीन भूखंड एकत्रित करण्यासाठी कऱ्हाड  येथील भूमिअभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक अधिकारी आनंदराव विठ्ठल माने ( ३५, मूळ रा. निढवळ. पो वडूज, ता. खटाव) याला १३ हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित तक्रारदार यांना कऱ्हाड येथील तीन भूखंड एकत्रित करायच्या होत्या. त्यासाठी ते कऱ्हाड येथील भूमिअभिलेख कार्यालयात गेले. यावेळी हे काम करून देण्यासाठी आनंदराव माने याने तक्रारदाराकडे १५ हजारांची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती १३ हजार रुपये देण्याचे ठरले.

दरम्यान, संबंधित तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत अधिकाऱ्यांकडे रितसर लेखी तक्रार केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी सापळा लावला. कऱ्हाड येथील कार्यालयातच १३ हजारांची लाच घेताना आनंदराव माने याला रंगेहात पकडण्यात आले. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली आनंदराव मानेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार भरत शिंदे, संजय साळुंखे, अजित कर्णे, विनोद राजे, संभाजी काटकर, तुषार भोसले यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर