क्षेत्रमाहुलीत बंद घरातून चांदीच्या मूर्ती लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:38 IST2021-01-25T04:38:49+5:302021-01-25T04:38:49+5:30

सातारा : येथील क्षेत्रमाहुलीत एका बंद घरातून सात हजार रुपये किमतीच्या देवाच्या मूर्ती चोरीला गेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ...

Lampas silver idols from a closed house in the area | क्षेत्रमाहुलीत बंद घरातून चांदीच्या मूर्ती लंपास

क्षेत्रमाहुलीत बंद घरातून चांदीच्या मूर्ती लंपास

सातारा : येथील क्षेत्रमाहुलीत एका बंद घरातून सात हजार रुपये किमतीच्या देवाच्या मूर्ती चोरीला गेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. २ जानेवारी ते दि. २१ जानेवारी दुपारी एक या वेळेत घडली आहे. सूर्यकांत जयसिंग मांढरे (वय ५८, रा. मु. पो. क्षेत्रमाहुली, ता. सातारा. सध्या रा. वल्लभनगर, पिंपरी, पुणे) यांच्या क्षेत्रमाहुली येथील बंद घराच्या दरवाजाचा सेफ्टी डोअर, मेन डोअर बेडरूम या तिन्ही खोल्यांचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडले. घरात प्रवेश करून घरातील चांदीच्या मूर्ती, करंडा असा सात हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक ए. एस. खलिफा करत आहेत.

Web Title: Lampas silver idols from a closed house in the area