शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

लामजचा पाऊस दहा हजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:33 IST

बामणोली : मागील महिन्यात मान्सूनच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली ...

बामणोली : मागील महिन्यात मान्सूनच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होता. पावसाने उघडीप घेतली असली तरी साताऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या लामजमध्ये अजून संततधार सुरू आहे. मागील १०८ दिवसांमध्ये गावात १० हजार २३९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, गावातील उत्तेश्वर पद्मावती मंदिराचा ४० फूट उंचीचा कळस जमीनदोस्त झालासातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून बºयाच ठिकाणी पावसाने उघडीप दिली असली तरी लामज गावात अजूनही तो जोरदार कोसळतच आहे.लामज हे गाव सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला कोयना जलाशयाच्या काठावर महाबळेश्वर तालुक्यात आहे. सुमारे ९० घरांच्या उंबऱ्यांचे व साधारण ४०० लोकसंख्येचे दुर्गम खेडेगाव आहे. हे गाव कांदाटी खोºयात असून, या गावात जाण्यासाठी बामणोली येथून लाँचने सुमारे दीड तास वेळ लागतो. जिल्हा परिषदेची लाँच या गावात जाते. दुसरीकडून तापोळा येथून तराफ्यात गाडी घेऊन पलीकडून गाढवलीमार्गे कच्च्या रस्त्याने जाता येते.लामज या गावात १ जून ते १६ सप्टेंबर या १०८ दिवसांत वरुणराजा १० हजार २३९ मिलिमीटर एवढा बरसला आहे. या गावात दोन वर्षांपूर्वी बसविलेल्या पर्जन्यमापकावर तशी नोंद झाली आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने कच्चा रस्ताही वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे सध्या ग्रामस्थांना पाण्यातून लाँचनेच प्रवास करावा लागतो. तसेच पावसाने परिसरातील विजेचे खांब पडल्याने गाव अंधारातच आहे. तर दुसरीकडे उत्तेश्वर येथील बीएसएनएलचा मोबाईल टॉवर तर जून महिन्यापासून बंद आहे.