शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मण मानेंची दिलगिरी अन् मराठा क्रांतीची गांधीगिरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 16:32 IST

सातारा : येथील निवासस्थानी उपराकार लक्ष्मण माने यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक येऊन माने साहेब ...

ठळक मुद्देलक्ष्मण मानेंची दिलगिरी अन् मराठा क्रांतीची गांधीगिरी!पोलिसांकडून समजूत : पत्रकार परिषद सुरू असतानाच समन्वयक आले

सातारा : येथील निवासस्थानी उपराकार लक्ष्मण माने यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक येऊन माने साहेब आमचे काय चुकले का ? आम्हाला माफ करा, तुमचे दर्शन द्या, असे म्हणत घराबाहेरच गांधीगिरीप्रमाणे म्हणणे मांडण्यास सुरुवात केली.

त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी माने यांनी दिलगिरीची प्रेसनोट दिल्यानंतर पोलिसांनी समन्वयकांची समजूत काढली. त्यानंतर समन्वयक निघून गेले.येथील निवासस्थानी लक्ष्मण माने यांनी त्यांच्याविरुद्ध सध्या सुरू असलेल्या आरोपांबाबत पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आले.

निवासस्थानाबाहेरूनच त्यांनी माने साहेब आम्हाला माफ करा, तुम्ही खूप मोठे आहात. आम्ही पाटील असल्यामुळे तुमची खूप भीती वाटते. आमचं काय चुकलं का? तुम्ही आम्हाला लांबून तरी दर्शन द्या, तुमची आम्हाला माफी मागायची आहे, असे गांधीगिरी आंदोलनाप्रमाणे आपले म्हणणे मांडण्यास सुरुवात केली.

त्यावेळी तेथे उपस्थित असणारे पोलीस त्वरित निवासस्थानाबाहेर आले. तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हेही लवकरच घटनास्थळी पोहोचले.समन्वयकांनी पोलिसांना आम्हाला माने साहेबांची माफी मागायची आहे, त्यांना बाहेर बोलवा, आम्ही जातो, असे सांगितले. त्यानंतर पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी माने यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी बाहेर येऊन समन्वयकांशी चर्चा केली. त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला; पण समन्वयक ऐकून घेत नव्हते.

शरद पवार यांचे नाव घेऊन राजकारण केले, पवार यांचे काय चुकले का? आता आम्हाला माने साहेब यांची माफी मागायचीच आहे म्हणूनच आम्ही येथे आलो आहे. लाखोने आमचे मोर्चे निघाले, कोठेही चुकीचा प्रकार झाला नाही. आम्ही शांततेने त्यांची माफी मागतो, असे सांगितले. त्यावेळी माने यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्याबद्दलची प्रेसनोट देण्यात आली व ती समन्वयकांना देण्यात आली.

पोलिसांनी मध्यस्थीची भूमिका घेत समन्वयकांची समजूत काढली. त्यानंतर सर्वजण गेले. या मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांत बापू क्षीरसागर, संदीप पोळ, शरद जाधव, संदीप नवघणे, शिवाजीराव काटकर, साईराज कदम, तेजस कदम, आकाश साबळे यांचा समावेश होता.

टॅग्स :marathaमराठाSatara areaसातारा परिसर