शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

कूस खुर्दमध्ये दांडपट्ट्याचा शतकी परंपरा !

By admin | Updated: April 28, 2016 00:07 IST

थरार कायम : लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच पारंगत; सर्वच कुटुंबांत खेळले जातात मर्दानी खेळ

सातारा : तब्बल ११० वर्षांची परंपरा जोपासत सातारा तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या परळी भागातील कूस खुर्द येथील ग्रामस्थांनी दांडपट्टा, अग्निचक्र, तलवारबाजी या मर्दानी खेळाचा थरार जीवंत ठेवला आहे. गावातील जवळपास सर्व कुटुंंबातील वयोवृद्धापासून ते लहान मुले सुद्धा या खेळात पारंगत झाली असून, याचे प्रात्यक्षिक प्रत्येक वर्षी होणाऱ्या यात्रेमध्ये दाखविले जाते.कूस खुर्द येथील दिवंगत बाळकू देटे हे ११० वर्षांपूर्वी मुंबई येथे नोकरीस होते. यावेळी ते कोकणी लोकांमध्ये राहून दांडपट्टा, अग्निचक्र, तलवार खेळ, लाटने चक्र, भाला, मारकाठी, तिचक्या, दोन-चार-सहा गोळे चक्र आदी मर्दानी खेळ शिकले होते. अधुन-मधून सुट्टीस गावी आल्यावर गावातील मित्रांना ते शिकवत असत. त्यांनी मुंबई सोडल्यावर गावामध्येच शिवशक्ती दांडपट्टा लेझिम मंडळाची स्थापना केली आणि गावाची वेगळीच ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांच्या या चौथ्या पिढीने या मर्दानी खेळाची परंपरा जपली आहे. पूर्वीच्या लोकांप्रमाणेच सध्याच्या तरुणपिढीलाही या मर्दानी खेळाची आवड आहे. परळी भागातील अनेक गावच्या यात्रांमध्ये, वरातीमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमात या खेळांची प्रात्यक्षिक होत असतात. विशेष म्हणजे सध्याच्या युगात डॉल्बी व डि. जे. चे वारे आहे. मात्र, या गावामध्ये प्रत्येक वरातीला दांडपट्ट्याचे मर्दानी खेळ सादर करतात. यामध्ये ८ वर्षांपासून ते ८३ वर्षांपर्यंतचे वयोवृद्ध सहभागी होत आहेत.कूस गावामध्ये येणारे पाहुणेमंडळी मधील हौसी तरुण मुले येथील ग्रामस्थांकडून शिकण्यासाठी आग्रह करतात. तर शेजारच्या गावातीलही मुले शिकण्यासाठी या गावामध्ये जात आहेत. परळी भागामध्ये फक्त याच गावी दांडपट्टा खेळला जातो. गावतील जवळपास सर्वच कुटुंबातील लोक हा मर्दानी खेळ खेळताना दिसतात. अनेक ठिकाणी या मंडळाने बक्षीसही मिळवली आहेत. (प्रतिनिधी)कूसमध्ये गेल्या ११० वर्षांपासून दांडपट्टा व इतर मर्दानी खेळ खेळले जातात. सध्या डि. जे. व डॉल्बीचे युग चालू आहे. त्यात या गावाने दांडपट्टा हा खेळ जीवंत ठेवला तर सध्या मल्लखांब हा खेळही कालबाह्य होत चालला असल्याने ग्रामस्थ व तरुण मंडळ मुलांसाठी मल्लखांब व मुलींसाठी रोप मल्लखांब चालू करणार आहेत. या मल्लखांब संपूर्ण परळी भागातील मुला-मुलींसाठी शिकविण्यात येणार आहे.हा मर्दानी खेळ तीन पौंडावर आहे. या खेळाची सुरुवात आमच्या वडिलांनी केली. ते सुटीवर आले की सर्वांना शिकवायचे आणि सध्या त्यांची चौथीपिढी हा खेळ करीत आहे. मी सुद्धा ८३ वर्षांपर्यंत हा खेळ खेळत होतो. गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती, तरुणवर्ग हा मर्दानी खेळ शिकला आहे. सध्या सर्वत्र डि. जे, डॉल्बीचे युग असतानाही आमच्या दांडपट्टा मंडळाची मागणी तेवढीच आहे.-सखाराम बाळकू देटे, ग्रामस्थ, कूस खुर्द