शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कुकुडवाड-नंदीनगर रस्ता उरला केवळ नावापुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 16:19 IST

Roadsefty, trafic, sataranews कुकुडवाड ते मायणी या रस्त्यावर असलेल्या कुकुडवाड (नंदीनगर) येथील खिंड वाहतुकीला धोकादायक ठरू लागली आहे. धोकादायक वळणावरील संरक्षक कठडे व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कुकुडवाड ते नंदीनगर या पाच किलोमीटरच्या रस्त्यावरून येजा करताना वाहनधारकांच्या काळाजाचा ठोकाच चुकत आहे.

ठळक मुद्देकुकुडवाड-नंदीनगर रस्ता उरला केवळ नावापुरताचअपघातात वाढ : साईडपट्ट्या खचल्या; संरक्षक कठडे गायब

कुकुडवाड : कुकुडवाड ते मायणी या रस्त्यावर असलेल्या कुकुडवाड (नंदीनगर) येथील खिंड वाहतुकीला धोकादायक ठरू लागली आहे. धोकादायक वळणावरील संरक्षक कठडे व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कुकुडवाड ते नंदीनगर या पाच किलोमीटरच्या रस्त्यावरून येजा करताना वाहनधारकांच्या काळाजाचा ठोकाच चुकत आहे.माण तालुक्याच्या दक्षिणेला नंदीनगर येथील खिंड म्हणजेच एक ते दीड किलोमीटरचा वळणाचा घाट आहे. या घाटात वेडीवाकडे वळणे आहेत. ही खिंड माण व खटाव या दोन तालुक्यांच्या सीमेवर असून, या रस्त्यावरून विटा, तासगाव, सांगली, कोल्हापूर या भागाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. कुकुडवाड ते नंदीनगर खिंड या पाच किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. साईडपट्ट्या खचल्या आहेत. संरक्षक कठडेही नावापुरतेच उरले आहेत.या घाटरस्त्यात काही आजवर अनेक अपघात झाले आहेत. या धोक्याची पूर्वकल्पना देऊन सुद्धा दहिवडी सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ व वाहनधारकांमधून केला जात आहे. वाहनधारक व प्रवाशांचे हित लक्षात घेता या खिंडीतील संरक्षक कठड्यांची व रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

कुकुडवाड गावापासून ते नंदीनगर खिंड या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाला आहे. त्यामुळे प्रवासी व वाहनधारकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल.- उमेश काटकर, पोलीस पाटील, कुकुडवाड

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर