शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा कारखाना निवडणुकीचा बिगुल वाजला, २९ जूनला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 19:51 IST

krushna sugar factory karad Election: निवडणुकीसाठी मंगळवारी २५ मे पासून १ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज कराड येथे दाखल करावयाचे आहेत. उमेदवारी दाखल अर्जांची छाननी २ जूनला सकाळी अकरापासून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सुरू होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककराड : रेठरे बुद्रुक ता.कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी जाहीर झाली आहे. निवडणूकीसाठी २९ जूनला मतदान होणार आहे. तर मतमोजणी १ जुलैला होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी सदरचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. (krushna sugar factory karad Election declared. )

 दरम्यान या निवडणुकीसाठी मंगळवारी २५ मे पासून १ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज कराड येथे दाखल करावयाचे आहेत. उमेदवारी दाखल अर्जांची छाननी २ जूनला सकाळी अकरापासून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सुरू होणार आहे. उमेदवार अर्ज माघारीची मुदत ३ जून ते १७ जूनपर्यंत सकाळी ११ ते ३ यावेळेत आहे. १८ जूनला निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. याच दिवशी चिन्ह वाटप होणार आहे तर २९ जूनला सकाळी आठ ते दुपारी पाच या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर १ जुलैला मतमोजणी होणार आहे

सातारा जिल्ह्यातील कराड सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, खानापूर, पलूस या पाच तालुक्यांमध्ये कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. अंतिम मतदार यादी नुसार कारखान्याचे ४७ हजार १६० सभासद मतदार आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहा गट करण्यात आले आहेत. यात वडगाव हवेली - दुशेरे गट ३, काले कार्वे गट ३, नेरले तांबवे गट ३, रेठरे हरणाक्ष बोरगाव गट ३, येडे माचिंद्र वांगी गट २, रेठरे शेनोली गत २ असे सहा गट आहेत. त्यातून १६ उमेदवार निवडले जाणार आहेत. तर राखीव गटात अनुसूचित जाती जमाती १, महिला राखीव २, इतर मागास प्रवर्ग१, विमुक्त जाती भटक्या जमाती १ असे ५ एकूण २१ उमेदवार निवडून द्यायचे आहेत.

कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य इमारतीच्या सभागृहात निवडणूक कार्यालय करण्यात आले आहे. तेथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकSugar factoryसाखर कारखाने