शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

Satara: 'कृष्णा'ला सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठी राज्यस्तरीय पुरस्कार

By प्रमोद सुकरे | Updated: January 23, 2025 17:38 IST

शरद पवारांच्या हस्ते तर अजित पवारांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान 

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील  कृष्णा सहकारी साखर कारखान्यास पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने दक्षिण महाराष्ट्र विभागातील सन २०२२-२३ या गळीत हंगामासाठी सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. विनायक भोसले यांच्यासह संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला.पुणे येथील कार्यक्रमास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे- पाटील, आमदार जयंत पाटील, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, माजी सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, व्हीएसआयचे सल्लागार शिवाजीराव देशमुख, महासंचालक संभाजी कडू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते.कारखान्याने गेली १० वर्षे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखाना उत्कृष्ट वाटचाल करत आहे. कृष्णा कारखान्याने सन २०२२-२३ या गळीत हंगामात एकूण उत्पादन प्रक्रियेचा खर्च (६००.२० रुपये प्रति क्विंटल) हा राज्याच्या सरासरी साखरेच्या एकूण उत्पादन प्रक्रियेच्या खर्चापेक्षा (८०५.०४ रुपये प्रति क्विंटल) कमी ठेवत, उत्कृष्ट नफा निर्देशांक राखला आहे. तसेच कारखान्यातील साखरेचा प्रति क्विंटल रोखीचा उत्पादन प्रक्रिया खर्च (४४६.७९ रुपये प्रति क्विंटल) हा राज्याच्या सरासरी प्रति क्विंटल रोखीच्या उत्पादन प्रक्रिया खर्चापेक्षा (५४१.९२ रुपये प्रति क्विंटल) कमी आहे. याशिवाय खेळत्या भांडवलावरील व्याजाचा खर्चदेखील (८३.१० रुपये प्रति क्विंटल) हा राज्याच्या सरासरी साखरेच्या प्रति क्विंटल खेळत्या भांडवलावरील व्याजाच्या खर्चापेक्षा (१०९.८० रुपये प्रति क्विंटल) कमी राखत, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन केले आहे.कारखान्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत व्ही.एस.आय.ने सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनासाठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कृष्णा कारखान्याला प्रदान केला. यावेळी कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, संजय पाटील, बाजीराव निकम, जे.डी.मोरे, विलास भंडारे, अविनाश खरात, वसंतराव शिंदे, श्रीरंग देसाई, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी.एन देशपांडे, मनोज पाटील, वैभव जाखले, फायनान्स मॅनेजर राजाराम चन्ने, चीफ अकौंटट पंडित झांझुर्णे, अकौंटट संदीप भोसले आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेKaradकराड