शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

‘कृष्णा’, ‘कोयना’ धोकापातळीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:01 PM

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने अक्षरश: कहर केल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच आता जिल्ह्यातील बहुतांशी धरणांतून ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने अक्षरश: कहर केल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच आता जिल्ह्यातील बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरू असून, कृष्णा आणि कोयना नद्यांतील पाण्याने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.गेल्या १५ दिवसांपासून पश्चिम भागात सतत हजेरी लावणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून अक्षरश: कहर केला असून, पश्चिम भागातील लोकांचा संपर्क तुटल्यातच जमा आहे. रस्त्यात झाडे पडणे, घाटात दरड कोसळणे, ओढे, नाले दुथडी भरून वाहने आणि वरून धो-धो पाऊस यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही मुश्कील होऊन गेले आहे. शनिवारी रात्रीपासून पावसाचा आणखी जोर वाढला आहे. सातारा शहराबरोबर पश्चिमेकडील कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळा या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, नुकसानीच्या घटनांत वाढ झाली आहे.या पावसामुळे ओढे, नाले भरून वाहत आहेत. तसेच धरणामध्येही पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. कोयना धरणात तर सध्या एक लाख क्युसेकहून अधिक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता धरणातील साठा ९६.७५ टीएमसीपर्यंत पोहोचला होता. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे ११ फुटांपर्यंत वर उचलण्यात आले. त्यामधून ६५ हजार ८१३ व पायथा वीजगृहातून २१०० असा ६७ हजार ९१३ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.दरम्यान, जिल्ह्यातील इतर धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे, तर कोयना आणि कृष्णा नद्यांची पाणीपातळी धोक्याकडे वाटचाल करू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेची सूचना केली आहे.नदीची धोकापातळी अशी...कृष्णा नदीची सातारा शहराजवळील संगम माहुली येथे धोका पातळी ६२६ मीटर आहे. रविवारी सकाळी ही पातळी ६१८ मीटरवर होती. तसेच कºहाडात ५६७ मीटरवर धोका पातळी असून, सध्या तेथील पाणी ५५९ मीटरवर आहे. कोयना नदीची धोका पातळी ५६५ मीटर असून सध्या पातळी ५६३ मीटर आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.शाळेची भिंत आठ दुचाकींवर पडलीकºहाड येथील लाहोटी कन्या शाळेची धोकादायक संरक्षक भिंत रविवारी मुसळधार पावसामुळे दुपारी कोसळली. यामध्ये तब्बल सात ते आठ दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.