शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरण साठ्याने पार केला १०० टीएमसीचा टप्पा, ९५ टक्क्यांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:59 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमीच असून रविवारी कोयनेला २५, नवजा येथे ४९ आणि महाबळेश्वरला ६५ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०० टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. टक्केवारी ९५.४८ झाली असून धरण भरण्याकडे वाटचाल करु लागले आहे.

ठळक मुद्देकोयना धरण साठ्याने पार केला १०० टीएमसीचा टप्पा, ९५ टक्क्यांवर पाणी पावसाचा जोर कमी; नवजाला ४९ तर महाबळेश्वरला ६५ मिलिमीटर

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमीच असून रविवारी सकाळपर्यंत कोयनेला २५, नवजा येथे ४९ आणि महाबळेश्वरला ६५ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०० टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. टक्केवारी ९५.४८ झाली असून धरण भरण्याकडे वाटचाल करु लागले आहे.सातारा शहरासह पश्चिम भागात एक महिन्यापासून पाऊस सुरू झाला आहे. जून महिन्यानंतर आॅगस्ट महिन्यात पावसाने दमदार सुरूवात केली.

सुरूवातीला कोयनानगर, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर भागात दमदार पाऊस कोसळला. तसेच धरण क्षेत्राही पावसाने धुवाँधार हजेरी लावली. त्यामुळे कोयना, तारळी, धोम, उरमोडी, बलकवडी, कण्हेर यासारख्या प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. झपाट्याने धरणे भरु लागली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वच धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला.सध्यस्थितीत पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झालेला आहे. कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळा भागात पाऊस होत असलातरी प्रमाण कमी आहे. रविवारी सकाळपर्यंत कोयनेला २५ आणि यावर्षी आतापर्यंत ४११९ मिलिमीटर पाऊस झाला. तर नवजाला सकाळपर्यंत ४९ व जूनपासून आतापर्यंत ४७२८ आणि महाबळेश्वरला ६५ व यावर्षी आतापर्यंत ४६०९ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.पूर्व भागात पावसाची उघडीप...सातारा शहरात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. रविवारीही ढगाळ वातावरण होते. तसेच वारे वाहत होते. तर पूर्व भागातही गेल्या १५ दिवसांपासून पावसाची उघडीप कायम आहे. दुष्काळी भागातील तलाव भरण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. 

 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणRainपाऊसSatara areaसातारा परिसर