शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरण अखेर ‘फुल्ल’, विसर्ग सुरूच; सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

By दीपक शिंदे | Updated: September 21, 2022 16:37 IST

कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे महाराष्ट्रातील वीजनिर्मिती व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांतील बहुतांशी भागाचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

कोयनानगर (सातारा): महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरण आज, बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शंभर टक्के भरले. तसेच धरणात पाण्याची आवक सुरूच असल्यामुळे दुपारी दोन वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उघडून नदीपात्रात प्रतिसेकंद १० हजार ५१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.कोयना धरण बुधवारी दुपारी बारा वाजता पूर्ण क्षमतेने भरले. धरणाचा पाणीसाठा १०५.२५ टीएमसी झाला आहे. पाणीपातळी २१६३.०६ फूट झाली असून, सप्टेंबर महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळेच ११ सप्टेंबरपासून पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. अजूनही तो विसर्ग सुरूच आहे; तर १३ सप्टेंबर रोजी सहा वक्री दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्यात आला होता. त्यामध्ये वारंवार बदल करून पाणीपातळी नियंत्रित करण्यात आली.आज, पुन्हा दुपारी २ वाजता सहा वक्री दरवाजे एक फुटाने उघडून ९४६३ क्युसेक व पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक असा कोयना नदीपात्रात एकूण १० हजार ५१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने कोयना नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला...कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे महाराष्ट्रातील वीजनिर्मिती व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांतील बहुतांशी भागाचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या धरणातील पाणीसाठ्यावर या तिन्ही राज्यांचे लक्ष लागून असते. धरण पूर्ण क्षमतेने भरले की त्याचा तिन्ही राज्यांना फायदा होत असतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी