शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कोयना धरण ९९ टक्के भरले, पाणीसाठा १०४ टीएमसीवर! 

By नितीन काळेल | Updated: September 2, 2024 18:59 IST

महाबळेश्वर १९, नवजाला २७ मिलिमीटर पाऊस 

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडतच असून २४ तासांत महाबळेश्वरला १९ तर नवजा येथे २७ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेतही पाण्याची सावकाश आवक असलीतरी पाणीसाठा १०४ टीएमसीवर गेला. त्यामुळे धरण ९९ टक्के भरले भरले आहे. तसेच इतर धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत.जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाला. तर जुलैमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे पश्चिम भागातील तळ गाठलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. सर्वच धरणे ८० टक्क्यांवर भरली. पूर्व भागात मागील वर्षभर दुष्काळ होता. सततच्या पावसामुळे तलाव आणि धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. आॅगस्ट महिन्यातही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळे दुष्काळाचे सावट दूर झालेले आहे.

पश्चिम भागात मागील १५ दिवसांपासून पाऊस होत आहे. सुरूवातीला जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा जोर कमी होत गेला आहे. तरीही धरणे पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत. सध्या कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख धरणांत १४६ टीएमसीवर पाणीसाठा गेलेला आहे. त्यातच सध्या पाऊस होत असल्याने धरणात आवक होत आहे. त्यामुळे पाणी विसर्ग करावा लागतोय.

सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर नवजा येथे २७ आणि महाबळेश्वरला १९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर एक जूनपासून सर्वाधिक पावसाची नोंद नवजा येथे ५ हजार ८९२ मिलीमीटरची झाली. यानंतर महाबळेश्वरला ५ हजार ६७५ आणि कोयनानगर येथे ५ हजार ७१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४ हजार ६०७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात १०४. ०६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण ९८.८७ टक्के भरले आहे.

टॅग्स :Koyana Damकोयना धरण