शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

कोयनेत ६७ टीएमसी साठा, सांगलीची सिंचन मागणी वाढली; ३१ मेपर्यंत पाणी पुरवावे लागणार 

By नितीन काळेल | Updated: February 20, 2024 19:18 IST

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात ६७ टीएमसी साठा असून पाण्याची मागणी सतत होत आहे. त्यातच आता सांगली ...

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात ६७ टीएमसी साठा असून पाण्याची मागणी सतत होत आहे. त्यातच आता सांगली पाटबंधारे विभागाकडूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने धरणाच्या आपत्कालिक द्वारमधून ५०० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सांगलीसाठी पायथा वीजगृह २१०० आणि द्वारमधील ५०० असा एकूण २६०० क्यूसेकने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सर्वाधिक धरणे आहेत. कोयना, धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर, उरमोडी अशी काही मोठी धरणे आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता सुमारे १४८ टीएमसी इतकी आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबरपर्यंतच्या पावसाळ्यात ही धरणे भरतात. त्यामुळे वर्षभराचे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करता येते. मात्र, गेल्यावर्षी जिल्ह्यातच पर्जन्यमान कमी झाले. वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांहून कमी पाऊस पडला. त्यातच कोणत्याही तालुक्याने १०० टक्केचा टप्पाही गाठला नाही. त्यामुळे गेल्यावर्षी आॅक्टोबरपासूनच जिल्ह्यात पाणीटंचाई आहे. तर पाऊस कमी पडल्याने कोयनेसह मोठी धरणे भरली नाहीत. मात्र, या धरणांवर विविध सिंचन योजना अवलंबून आहेत. तसेच शेकडो गावांची तहानही भागत आहे. त्यामुळे सध्या कोयनेतील पाण्यासाठी मागणी वाढली असल्याने विसर्ग करावा लागत आहे.

कोयना धरणातून सांगलीसाठी पाणी सोडण्यात येत होते. पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू करुन २१०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. पण, सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी जादा पाणी सोडण्याची मागणी झाली. त्यामुळे मंगळवारी दुपारी १२ वाजल्यापासून धरणाचे आपत्कालिन द्वार खुले करण्यात आले. त्यातून ५०० क्यूसेक वेगाने सांगलीसाठी पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. या कारणाने आता सांगलीसाठी २६०० क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. हे सर्व पाणी कोयना नदीपात्रात जात आहे. सांगलीसाठी आणखी काही दिवस काेयनेतून विसर्ग सुरू राहील, अशी माहिती मिळत आहे.

३१ मेपर्यंत पाण्याचे नियोजन करावे लागणार..कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. गेल्यावर्षी धरण ९५ टीमएसीपर्यंतच भरले होते. सध्या धरणात ६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी ३१ मेपर्यंत पुरवावे लागणार आहे. या धरणातील पाण्यावर महत्वाच्या तीन सिंचन योजना अवलंबून आहेत. टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी पाणी विसर्ग करण्यात येतो. त्यातून शेकडो हेक्टर शेतीला फायदा होतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी