शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

पोत्यात आढळले कोयते अन् तलवारी, साताऱ्यातील एकजण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 17:58 IST

Crimenews Satara : सातारा जिल्हा पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखा व दहशतवाद विरोधी पथकाने रात्रगस्त दरम्यान साताऱ्यातील एका तरुणाला ताब्यात घेऊन ११ धारदार शस्त्रे जप्त केली. यामध्ये ७ लांब कोयते अन् ४ धारदार तलवारींचा समावेश आहे. दरम्यान, पकडलेल्या युवकाला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

ठळक मुद्दे पोत्यात आढळले कोयते अन् तलवारी, साताऱ्यातील एकजण ताब्यातदहशतवाद विरोधी पथकाने ११ धारदार शस्त्रे केली हस्तगत

सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखा व दहशतवाद विरोधी पथकाने रात्रगस्त दरम्यान साताऱ्यातील एका तरुणाला ताब्यात घेऊन ११ धारदार शस्त्रे जप्त केली. यामध्ये ७ लांब कोयते अन् ४ धारदार तलवारींचा समावेश आहे. दरम्यान, पकडलेल्या युवकाला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी जिल्ह्यात आढळून येणार्‍या बेकायदेशीर शस्त्राबाबत कारवाई करण्याची सूचना पोलिसांना केली आहे. त्यानुसार जिल्हा विशेष शाखा व दहशतवाद विरोधी पथक गुरुवारी रात्री शहरात पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी विभुते, प्रताप भोसले, हवालदार सागर भोसले, सुमित मोरे, केतन जाधव, राहुल वायदंडे हे सातारा शहर व परिसरात रात्रगस्त करीत होते. त्यावेळी रात्री नऊच्या सुमारास दिव्यानगरी ते कोंडवे रस्त्यावर गोवर्धन कॉलनी येथे एक अनोळखी तरुण या पथकास पाहून तेथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या भिंतीच्या मागे जाऊन लपून बसला.

हे पाहताच पोलिसांनी त्याच्याकडे जाऊन चौकशी केली. तसेच त्याची वागणूक व हालचालीवरून संशय वाढला. त्यावेळी झडती घेतली असता त्याच्याजवळ एका पोत्यात ११ धारदार शस्त्रे मिळाली. यामध्ये ७ लांब कोयते आणि ४ धारदार तलवारीचा समावेश आहे.

याची किंमत १८५०० रुपये आहे. याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. संबंधितांचे नाव सचिन बाळू चव्हाण (वय २८, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) आहे.दहशतवाद विरोधी पथकाने तरुणाला पकडले. त्यानंतर त्याला सातारा पोलीस ठाण्यात ताब्यात दिले. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस त्याच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस