शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
2
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
6
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
8
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
9
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
10
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
11
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
12
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
13
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
14
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
15
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
16
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
17
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
18
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
19
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
20
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी

साताऱ्यात दहशत माजविणाऱ्या कोयता गँगचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 18:39 IST

सातारा शहरात गत काही महिन्यांपासून दहशत माजविणाऱ्या कोयता गँगचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, याप्रकरणी पोलिसांनी बर्थडे बॉयसह सहा आणि अन्य एका प्रकरणात दोन अशा एकूण आठजणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार कोयते आणि एक तलवार जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात कोयताना गँगचा पर्दाफाशचार कोयते, एक तलवार जप्त ; बर्थडे बॉयसह आठजणांना अटक

सातारा : शहरात गत काही महिन्यांपासून दहशत माजविणाऱ्या कोयता गँगचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, याप्रकरणी पोलिसांनी बर्थडे बॉयसह सहा आणि अन्य एका प्रकरणात दोन अशा एकूण आठजणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार कोयते आणि एक तलवार जप्त करण्यात आली आहे.आदिल अस्लम शेख (वय २६), शादाब अय्याज पालकर (वय २०), मिजान निसार चौधरी (वय ३०), तोसिफ अजिज कलाल (वय २६), शांदाब अस्लम शेख (वय २५), समीर अस्लम शेख (सर्व रा. दस्तगीर कॉलनी, शनिवार पेठ, सातारा), अभिजित राजू भिसे (वय १८, रा. सैदापूर, ता. सातारा), अमीर सलीम शेख (वय १९, रा. वनवासवाडी, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरामध्ये दहा जूनला दस्तगिर कॉलनीत राहणाऱ्या आदिल शेख याचा वाढदिवस होता. त्यावेळी त्याच्या वाढदिवसाचा केक कोयत्याने कापला होता. याचा फोटो पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी आदिल शेखला ताब्यात घेतले. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याचा मोबाइल तपासला असता मोबाइलमध्ये आणखी काही वेगवेगळ्या कोयत्यांचे फोटो असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी फोटोमध्ये दिसणाऱ्या एका-एकाला घरातून अटक केली. त्यांना पोलीसी खाक्या दाखविताच घरात लपवून ठेवलेले चार कोयते आणि एक तलवार पोलिसांच्या स्वाधिन केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोयते सापडल्याने शहरात खळबळ उडाली.

जप्त केलेले कोयते हॉकीस्टीक पेक्षा मोठे आहेत. या युवकांवर यापूर्वी कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही. मात्र, भविष्यात या टोळीकडून नक्कीच अनुचित प्रकार घडला असता, असे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे आदींनी केली.दरम्यान,  शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अन्य एका दुसºया घटनेतील दोघांना अटक केली. त्यामध्ये अभिजित भिसे आणि अमीर शेख या दोघांचा समावेश आहे. दि. १२ रोजीर्  या दोघांनी विसावा नाका येथे ओमणी कारची कोयत्याने तोडफोड केली होती.

चालक शिवाजी संदीपान सरगर (रा. शिक्षण कॉलनी, जुना आरटीओसमोर, सातारा) यांच्या खिशातील २७०० रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावली होती. तसेच उमेश गायकवाड याच्यावरही कोयत्याने वार करून त्याच्याकडील चेन आणि पाकिट चोरून नेले होते. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांच्या टीमने केली.कोयते तयार करणाऱ्याचा तपास सुरूकोयता बाळगणाऱ्या युवकांचा खाटिकाचा व्यवसाय आहे. मात्र, व्यवसायाला एवढे मोठे कोयते लागत नाहीत. हे मोठे कोयते जाणूनबुजून त्यांनी तयार करून घेतले आहेत. ज्यांनी हे कोयते तयार केले, त्यांच्याकडे आता पोलिसांनी आपला मोर्चा वळविला असून, संबंधितांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर