शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

माणसाला नोटा मोजण्याएवढे ज्ञानही पुरेसे :

By admin | Updated: July 5, 2016 00:29 IST

दातार-- व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी आणि व्यवसायात यशस्वी कसे व्हावे, याविषयी मनमोकळया गप्पा मारल्या.

कऱ्हाड : ‘जीवनात आणि उद्योगात यशस्वी होण्यासाठी खूप ज्ञानाची नाही तर चिकाटी, जिद्द व अपार मेहनतीची आवश्यकता आहे. ज्ञान कमी असले, अगदी नोटा मोजण्याइतपत असले तरी चालेल,’ असे मत अलअदिल उद्योग समूहाचे प्रमुख तथा मसालाकिंंग डॉ. धनंजय दातार यांनी व्यक्त केले.येथील रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, संगम व रोटरॅक्ट क्लब यांच्या संयुक्त पदग्रहण समारंभात ते बोलत होते. यावेळी असिस्टंट गव्हर्नर झोन ५ संदीप सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी डॉ. धनंजय दातार यांची प्रकट मुलाखत मंजिरी ढवळे यांनी घेतली. या मुलाखतीत त्यांनी व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी आणि व्यवसायात यशस्वी कसे व्हावे, याविषयी मनमोकळया गप्पा मारल्या. दुबईस्थित उद्योगपती असलेले डॉ. दातार हे कऱ्हाडचे जावई असल्याचे आणि त्यांची पत्नी वंदना दातार या कृष्णा हॉस्पिटलमध्ये नोकरी करीत होत्या व मुलाचा जन्मही याच हॉस्पिटलमध्ये झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आजारावर औषधोपचार सुद्धा कऱ्हाडच्या नचिकेत वाचासुंदर यांचा घेत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमात नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पार पडला. रोटरी क्लब आॅफ कऱ्हाडचे नूतन अध्यक्ष राहुल कुलकर्णी व सचिव अभय नांगरे यांनी अनघा बर्डे व वैभव कांबळे यांच्याकडून इनरव्हील क्लबचे नूतन अध्यक्षा शैलजा कापसे व सचिव सुजाता बेंद्रे यांनी पदभार स्वीकारला. तर इनरव्हील क्लब संगमचे नूतन अध्यक्ष म्हणून नयन पाटील व सचिव म्हणून वृषाली पाटणकर यांनी तर रोटरॅक्ट क्लब प्रीतिसंगमचे अध्यक्ष म्हणून कुमार संघवी व सचिव म्हणून रेणुका जाधव यांनी मावळत्या पदाधिकाऱ्यांकडून पदभार स्वीकारला. तर रोटरी क्लबच्या मानद सदस्यपदी शेखर चरेगावकर, डॉ. मोहन राजमाने व विनायक औंधकर यांची निवड करण्यात आली. संदीप सुतार यांनी संस्थेचे कार्य कसे चालते, याची माहिती दिली.या कार्यक्रमाला जयराम सचदेव, सुहास पवार, कमलाकर पाटील, अनिल सावंत, तुषार गद्रे, अभिजित चाफेकर, क्षितीज धुमाळ, चंद्रशेखर पाटील, जगदीश वाघ यांच्यासह कऱ्हाड तालुक्यातील सर्व रोटरियन उपस्थित होते. यावेळी दातार दाम्पत्य यांना रोटरी क्लबच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रो. अभय नांगरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)