शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नववीत शिकणाऱ्या मुलीवर चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 14:18 IST

नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर युवकाने चाकूने वार केले. शिद्र्रुकवाडी-खळे, ता. पाटण येथे शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यानंतर संशयित पसार झाला असून, या हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले नव्हते.

ठळक मुद्देनववीत शिकणाऱ्या मुलीवर चाकूने वारढेबेवाडीनजीक घटना : सात वार करून हल्लेखोर पसार

ढेबेवाडी : नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर युवकाने चाकूने वार केले. शिद्र्रुकवाडी-खळे, ता. पाटण येथे शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यानंतर संशयित पसार झाला असून, या हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले नव्हते.शिद्र्रुकवाडी येथील नववीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घरातून गावानजीक असणाऱ्या खळे येथील शाळेकडे पायी चालत निघाली होती. त्यावेळी शिद्र्रुकवाडी-खळे मार्गावर एका आडोशाच्या ठिकाणी एका युवकाने विद्यार्थिनीला अडवले. तिला काही समजण्यापूर्वीच त्याने सोबत आणलेल्या चाकूने त्या विद्यार्थिनीवर वार करण्यास सुरुवात केली.

क्षणार्धात संबंधित मुलगी रक्तबंबाळ झाली. हल्लेखोराने तिच्या नाक, कान, पाय आणि हातावर तब्बल सात वार केले. या परिस्थितीतही संबंधित मुलीने त्या हल्लेखोराचा प्रतिकार केला. त्यावेळी तिची हल्लेखोराशी झटापट झाली. अखेर हल्लेखोराने नजीकच्या उसाच्या शेतातून पळ काढला.

दरम्यान, गंभीर जखमी झालेली ती मुलगी त्याचस्थितीत शाळेमध्ये गेली. शाळेत गेल्यानंतर रक्तबंबाळ स्थितीत विद्यार्थिनीला पाहून शिक्षक हादरले. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवले. तसेच घटनेची माहिती पोलिसांना व तिच्या पालकांना देण्यात आली. पोलिसांनी संबंधित मुलीकडे हल्लेखोराबाबत चौकशी सुरू केली आहे. मात्र, दुपारपर्यंत हल्लेखोराबाबत कसलीच माहिती पोलिसांच्या हाती लागली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर