शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

‘क्रेझ’साठी हातात चक्क ‘खटका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST

कऱ्हाड : कोपर्डे हवेलीच्या रेल्वे फाटकाजवळ तस्करीसाठी आलेल्या युवकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी गावठी कट्ट्यासह देशी बनावटीची पिस्तूल हस्तगत केले. ...

कऱ्हाड : कोपर्डे हवेलीच्या रेल्वे फाटकाजवळ तस्करीसाठी आलेल्या युवकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी गावठी कट्ट्यासह देशी बनावटीची पिस्तूल हस्तगत केले. उपविभागात यापूर्वीही पोलिसांनी अशा कारवाया केल्या आहेत; पण तरीही तस्करी थांबायला तयार नाही. वारंवार असे गुन्हे उघडकीस येत आहेत. या गुन्ह्यांत केवळ दलाल पोलिसांच्या गळाला लागताहेत; तर तस्करीच्या मुळापर्यंत पोहोचण्यात पोलीस अपयशी ठरताहेत.

कऱ्हाड शहरासह उपविभागात शस्त्रतस्करीचे लोण पसरले आहे. बेकायदा हत्यारांची आयात आणि निर्यात हा गुन्हेगारी जगताचा पाया आहे. सध्या कऱ्हाड उपविभागात तस्करीच्या माध्यमातून हाच पाया भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उपविभागात कायदेशीररीत्या परवाना असणाऱ्या पिस्तूलधारकांची संख्या शेकडोंत आहे. मात्र, त्याहीपेक्षा बिगरपरवाना पिस्तूल वापरणाऱ्यांची संख्या कित्येक पटींनी जास्त आहे. बेकायदा शस्त्र मिळविण्यासाठी अनेकजण चोरीछुपे व्यवहार करीत आहेत.

वास्तविक, अनेकांना शस्त्राबाबतची पूर्ण माहिती नसते. देशी अथवा विदेशी बनावट, त्याची क्षमता, दर्जा यांबाबत ते अनभिज्ञ असतात. या अज्ञानाचा तस्करांकडून पुरेपूर गैरफायदा घेतला जातो. देशी बनावटीचे पिस्तूल ‘परदेशी’ कंपनीचे असल्याचे सांगून ते दलालांकडून विकले जाते. ६० ते ७० हजार रुपये मूळ किंंमत असलेली पिस्तुले परदेशी असल्याचे भासवून लाखाला विकली जातात. अशा पद्धतीने आजपर्यंत अनेक पिस्तुलांची विक्री करण्यात आली आहे. त्याबाबतचे गुन्हेही कऱ्हाडात उघडकीस आले आहेत.

सांगली, मिरज, कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड येथे विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी जप्त केलेली पिस्तुले याच पद्धतीच्या आहेत. पिस्तुलाबरोबरच काही रिव्हॉल्व्हरही पोलिसांनी यापुर्वी हस्तगत केल्या आहेत. पिस्तुल आणि रिव्हॉल्व्हरची किंमत तुलनेने जास्त असते. मात्र, गावठी कट्टा पंचवीस ते तीस हजारात विकला जातो. त्यामुळे अनेकजण ‘क्रेझ’साठी गावठी कट्टा खरेदी करीत असल्याचेही काही गुन्ह्यांतून उघड झाले आहे.

- चौकट

कायदेशीर ९०५ : बेकायदा किती?

कऱ्हाड उपविभागातील परवाना असलेल्या शस्त्रधारकांची संख्या ९०५ आहे. मात्र, आत्तापर्यंत उघडकीस आलेल्या गुन्ह्यांतून कायदेशीरपेक्षा बेकायदा शस्त्र बाळगणाºयांची संख्या जास्त असल्याचेच समोर येत आहे. गत काही वर्षात कºहाडमध्ये अनेक गुन्हे घडले. त्यामध्ये डझनावरी शस्त्रे हस्तगत झाली आहेत.

- चौकट

...अशी असतात अग्निशस्त्रे

(फोटो : १८रिव्हॉल्व्हर)

रिव्हॉल्व्हर : या अग्निशस्त्रात सहा गोळ्या बसतात. तसेच हे शस्त्र देशी व विदेशी बनावटीचेही असते. या शस्त्राची किंमत दीड लाखापर्यंत आहे. मात्र, तस्करीत खरेदी-विक्रीची रक्कम लाखोंच्या घरात असते.

(फोटो : १८पिस्टल)

पिस्तूल : पिस्तुलाच्या मॅगझिनमध्ये दहा गोळ्या बसतात. पिस्तूल एकदा ‘लोड’ केले की ‘ट्रिगर’ दाबताच एकापाठोपाठ दहा गोळ्या बाहेर पडतात. देशी व परदेशी बनावटीमध्ये हे शस्त्र मिळते. त्याची किंमत ८० हजारांपासून तब्बल १० लाखांपर्यंत असते.

(फोटो : १८गावठी कट्टा)

गावठी कट्टा : हे शस्त्र हाताने बनविलेले असते. तसेच बनावटीत काही दोष राहिल्यास ‘ट्रिगर’ दाबताच गोळी उडेलच, हे निश्चितपणे सांगता येत नाही. एकावेळी फक्त एकच गोळी या शस्त्रात बसते.

- चौकट

१० वर्षांत ५३ शस्त्रे हस्तगत

२००९ : ११

२०१० : ५

२०११ : ३

२०१२ : २

२०१३ : ५

२०१४ : ५

२०१५ : ३

२०१६ : ५

२०१७ : ४

२०१८ : ३

२०१९ : २

२०२० : ३

२०२१ : २

फोटो : १८केआरडी०३

कॅप्शन : कऱ्हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली गेटनजीक मंगळवारी युवकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह पिस्तुले आणि दोन जिवंत राउंड हस्तगत करण्यात आले होते.