शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

मुख्याधिकारी म्हणजे चहापेक्षा किटली गरम!

By admin | Updated: May 27, 2016 22:18 IST

उपनगराध्यक्षांची बोचरी टीका : म्हणे... ‘इमेज बिल्ड’ करण्यासाठी प्रशासन प्रमुख हुकूमशहाप्रमाणे वागतात--कऱ्हाड पालिका

कऱ्हाड : गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या प्रशासन प्रमुखांकडून आपली ‘इमेज बिल्ड’ करण्यासाठी हुुकूमशहाप्रमाणे वर्तन केले जात आहे. नियमांवर बोट ठवून स्वत:चे महत्त्व वाढविले जात आहे. हे म्हणजे चहापेक्षा किटली गरम, असाच प्रकार सुरू असल्याची बोचरी टीका उपनगराध्यक्ष सुभाष पाटील यांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर नाव न घेता केली.कऱ्हाड पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता देसाई होत्या. यावेळी नगरअभियंता एन. एस. पवार उपस्थित होते.सुभाष पाटील म्हणाले, ‘पालिकेकडून शहरातील नागरिकांना फलक लावण्यासाठी परवानगीच दिली जात नाही. यासाठी उच्च न्यायालयाच्या निकालावर बोट ठेवले जाते. परवानगी दिली जात नसल्यामुळेच नागरिकांकडून विनापरवानगी फलक लावण्यात येत आहेत. यासाठी पालिकेचे प्रशासनच जबाबदार आहे. विरोधी नगरसेवक विनायक पावसकर यांनी सार्वजनिक मंडळांकडून पालिका मंडप उभारणीसाठी अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याचे सांगत याबाबत नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली. मंडळांनी कार्यक्रम आयोजित करायचे की नगरपालिकेचे भाडे भरण्यासाठी पैसे गोळा करीत फिरायचे. नगरपालिकेने उत्पन्नवाढीसाठी इतर मार्ग अवलंबावेत, अन्यथा नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल.’सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक मानसिंग पाटील यांनी याबाबत आपण रीतसर ठराव घेऊन तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवू म्हणजे ही अन्यायी भाडेवाढ रद्द करता येईल, असे सांगितले. मार्केट यार्ड परिसरातील पी. डी. पाटील उद्यानाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधताना स्मिता हुलवान यांनी यासाठी प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले. अनेक विकासकामांबाबत नगरअभियंता एन. एस. पवार कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाहीत. तसेच सत्ताधारी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नसल्याची टीकाही त्यांनी केली. यावर उपनगराध्यक्ष पाटील तसेच राजेंद्र यादव यांनी यासाठी आमच्यापेक्षा मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारा, असा सल्ला दिला. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे बंधनकारक नसल्याचेही त्यांनी सांगितले.यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन कामाच्या दजार्बाबत विनायक पावसकर यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून या सभागृहाचे काम सुरू असून, ते अजिबात समाधानकारक झालेले नाही. तब्बल ६ कोटी खर्च करूनही हे काम अपूर्णच आहे. एसी बंद आहे, तर पंखे बसवण्यातच आलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एक कार्यक्रम सुरू असताना एसी नादुरुस्त झाल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. आता तर पहिलाच हॉल बरा होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दुपारच्या वेळीच जर टाऊन हॉल बंद ठेवण्यात येत असेल तर त्याचा सर्वसामान्य नागरिकांना उपयोग काय?’ श्रीकांत मुळे यांनी शिवाजी स्टेडियममध्ये तयार करण्यात आलेल्या बास्केटबॉल मैदानात अनेक त्रुटी असल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी) विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे वाभाडेविनायक पावसकर यांनी सत्ताधारी आघाडीच्या कामकाजाचे वाभाडे काढताना नगराध्यक्षांनाही लक्ष्य बनविले. ते म्हणाले, ‘प्रत्यक्ष नगराध्यक्षांच्या प्रभागातही अनेक कामे प्रलंबित राहिले आहेत. नगराध्यक्षांना काही अधिकार आहे की नाही? त्या आपल्या अधिकारांचा वापर कधी करणार? स्मिता हुलवान यांनीही नगराध्यक्षांनी सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराची जबाबदारी स्वीकारावी,’ अशी टीका केली.