शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

‘काशिनाथाचं चांगभलं’नं कवठेनगरी दुमदुमली

By admin | Updated: April 28, 2016 00:03 IST

बगाड यात्रा उत्साहात : बगाड ओढण्यासाठी बारा बैलांची ताकद; पारंपरिक सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील भाविकांची हजेरी

कवठे : कवठे, ता. वाई येथील बगाड यात्रेस दि. २७ एप्रिल पासून प्रारंभ झाला असून, यात्रेच्या पहिल्या दिवशी पारंपरिक बगाड यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. या यात्रेसाठी जिल्ह्यासह राज्यभरातील भाविक कवठे येथे दाखल झाले होते. ‘काशिनाथाचं चांगभलं, भैरवनाथाचं चांगभलं’च्या जयघोषाने कवठेनगरी दुमदुमली होती.यात्रेच्या पूर्वसंध्येला रात्री १२ वाजता भैरवनाथ मंदिरात कौल लावण्यात आला. सात ग्रामस्थांनी यंदा बगाड्या होण्यासाठी कौल आजमावला. यापैकी यशवंत घाडगे यांना कौल मिळाल्याने यंदाचा बगाड्या होण्याचा मान घाडगे यांना मिळाला. सोनेश्वर ओझर्डे येथे कृष्णा नदीमध्ये विधिवत स्नान करून बगाड्याला पहाटे मुकाई मंदिर विठ्ठलवाडी येथे पोहोचविण्यात आले. ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिरासमोरील पटांगणात रात्रभर बगाड गाडा तयार करण्याचे काम पूर्ण केले. यानंतर पहाटे गाडा विठ्ठलवाडी येथे कृष्णराव डेरे यांच्या भावकीतील बैलामार्फत पोहोचविण्यात आला. कवठे गावामध्ये एकूण अकरा भावक्या असून, या अकरा भावकीच्या बैलांना ठराविक अंतर बगाड ओढण्याची मुभा दिली जाते. यास खुता असे म्हणतात. प्रत्येक खुत्यात सहा बैलजोड्या म्हणजेच बारा बैलांनी गाडा ओढला जातो. दुपारी दीड वाजता बगाड रथ कवठे गावाकडे आणण्यास सुरुवात झाली. ‘काशिनाथाचं चांगभलं, भैरवनाथाचं चांगभलं’ या गजरात शिवारातून बगाड कवठे गावाकडे मार्गस्थ करण्यात आले. ठराविक अंतरानंतर बगाडाच्या शिडाच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आल्या. यामुळे अरिष्ट टळते असे मानले जाते. सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान बगाड कवठे गावात आले. यावेळी बगाड्यास खांद्यावरून भैरवनाथ मंदिरात नेऊन त्याच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.बगाड यात्रेसाठी राज्यभरातील भाविक कवठे येथे दाखल झाले होते. यात्रेनिमित्त रात्री छबिन्याचा कार्यक्रम पार पडला. (वार्ताहर)गावोगावच्या एकीचे दर्शनवाई तालुक्यातील कवठे, सुरूर, पांडे, बावधन, फुलेनगर गावात बगाड यात्रेची परंपरा असून, बगाड यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी संपूर्ण गावाची एकी व एकमुखी निर्णयावर बगाड मार्गपरिक्रमण करीत असते. त्यामुळे सर्व ग्रामस्थ एकमेकांशी सुसंवाद साधत असल्याने ज्या गावात बगाड यात्रा आहे त्या गावातील एकोपा वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. याचा फायदा गावाच्या संपूर्ण जडणघडणीवर होत असल्याने परिसरात ही गावे प्रगत होत आहेत.यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन कवठे येथे यात्रेनिमित्त दि. २८ रोजी प्रकाश अहिरेकर यांच्या तमाशाचे आयोजन करण्यात आले असून, संध्याकाळी नामवंत मल्लांच्या कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन पै. विकास राजगे व किसन शेळके यांची ५१ हजार रुपये व चांदीची गदा यावर कुस्ती होणार आहेत. महाराष्ट्रातील नामवंत मल्लांसमवेत जंगी फडाचे आयोजन यात्रा कमिटी मार्फत करण्यात आले असून, महिलांसाठी दि. २९ रोजी सुरेखा पुणेकर यांच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.