शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

किसान सन्मान योजना: कृषी विभागाची धडपड; साताऱ्यातील ९० हजार शेतकऱ्यांना केले पात्र

By नितीन काळेल | Updated: January 9, 2024 18:07 IST

वर्षाला मिळणार १२ हजार : ई-केवायसी अन् आधार प्रमाणीकरण पूर्ण 

सातारा : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत मिळत आहे. तरीही जिल्ह्यातील हजारो शेतकरी ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरणापासून दूर राहिल्याने त्यांना लाभ मिळत नव्हता. यासाठी राज्य कृषी विभागाने धडपड करुन सुमारे ९० हजार शेतकऱ्यांची नोंदणी केली. त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळण्यास मदत झाली आहे.   २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत व्हावी म्हणून वर्षाला सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मागील पाच वर्षे ही योजना सुरू आहे. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात तीन हप्त्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होतात. यातून शेतकरी शेतीपयोगी साहित्य, बियाणे, खते यांची खरेदी करतो. याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. तसेच आता राज्य शासनानेही शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ दिला जातोय. राज्य शासनही शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देत आहे.या योजनेचा सातारा जिल्ह्यातीलही शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे. या योजनेेंतर्गत ४ लाख ६६ हजार २०० शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. याच शेतकऱ्यांनाही नमो योजनेचा लाभ देय आहे. मात्र, योजनेत नोंद असूनही ७५ हजार ६७६ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नव्हती. तसेच ७२ हजार ३२६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नव्हते. यामुळे संबंधित शेतकरी लाभापासून वंचित होते. यासाठी राज्य कृषी विभागाने पूर्ण तयारी करुन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पाऊल उचलले. गावोगावी सभा, मेळावे घेत जनजागृती केली. त्यामुळे ४४ हजार १५१ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात यश आले. तर ४५ हजार ९३८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले. यामुळे सुमारे ९० हजार शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. परिणामी वर्षाला त्यांच्या बॅंक खात्यावर १२ हजार रुपये जमा होणाार आहेत.

आठ दिवसांत योजनेचा लाभ..सध्या सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत ८ हजार ५१० शेतकऱ्यांनी स्वयंनोंदणी केलेली आहे. त्यांना या योजनेच्या लाभाच्या प्रतिक्रियेत आणण्याचे काम ८ दिवसांत युध्दपातळीवर पूर्ण करण्यात आले. त्याचबरोबर तालुकास्तरावर मान्यतेसाठी प्रलंबित १४ हजार १७६ शेतकऱ्यांचीही प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. तर २० हजार ९१६ स्वयंनोंदणीकृत शेतकरी लाभऱ्श्यांची प्रक्रिया सुरू आहे. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान आणि राज्य शासनाच्या नमो योजनेचा लाभ मिळत आहे. या अंतर्गत कृषी विभागाने सुमारे ९० हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरण करुन घेतले. याचा लाभ आता शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी आदींनी अधिकाधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी विकसित भारत यात्रेंतर्गत योजनेचे काम प्रगतीपथावर ठेवले आहे. पात्र शेतकऱ्यांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा.  - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना