शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

फळांचा राजा सामान्यांच्या अवाक्यात - सातारा बाजारातील उच्चांकी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 20:14 IST

सातारा : बाजारात दाखल झाल्यापासून सर्वसामान्यांना वाकुल्या दाखवणारा फळांचा राजा अखेर सामान्यांच्या अवाक्यात आला आहे. बुधवारी साताऱ्याच्या बाजारपेठेत ६० गाड्या भरून आंब्याची आवक झाली.

ठळक मुद्दे६० गाड्या भरून आंबा; डझनाला दीडशे ते साडेतीनशेचा भाव

सातारा : बाजारात दाखल झाल्यापासून सर्वसामान्यांना वाकुल्या दाखवणारा फळांचा राजा अखेर सामान्यांच्या अवाक्यात आला आहे. बुधवारी साताऱ्याच्या बाजारपेठेत ६० गाड्या भरून आंब्याची आवक झाली. त्यामुळे सातशे रुपये डझनच्या घरात तोऱ्यात बसलेला हापूस आता साडेतीनशे रुपयांपर्यंत खाली उतरला आहे. आंब्यांच्या दरातील या घसरणीमुळे सामान्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.

साताऱ्याच्या बाजारपेठेत फेब्रुवारीपासूनच आंब्यांची आवक झाली होती. १५०० ते १७०० रुपयांचा उच्चांकी दर पटकावल्याने डझनभर आंबा नेणंही सामान्यांच्या अवाक्याबाहेर होते. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर साताºयात आंबरस पुरीचा बेत ठरलेला; पण नेमकं या मुहूर्तावर आंब्यांची पुरेशी आवक न झाल्याने दर चढेच राहिले. त्यामुळे अनेकांनी नगावर आंबे नेऊन हा सण साजरा करण्याचा प्रयत्न केला. रविवारीही आंब्यांची मोठी आवक होणं अपेक्षित होती. मात्र, त्यादिवशीही पुरेशी आवक न झाल्यामुळे आंब्यांचे दर सहाशे ते आठशेच्या रुपयांपर्यंत पोहोचले होते. बुधवारी बाजारपेठेत मोठी आवक झाल्यामुळे आंबा सामान्यांच्या अवाक्यात पोहोचला आहे.पहिला आंबा फेब्रुवारीत!कोकणातून येणारा आंबा कोल्हापूरमार्गे साताऱ्याच्या बाजारपेठत येतो. यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हापूस दाखल झाला होता. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून सामान्यांच्या अवाक्यात येणाºया आंब्याचे यंदाचे दर चढे राहिले. एप्रिल महिना संपेपर्यंत हे दर सहाशे ते आठशेच्या सुमारास राहिल्यामुळे आंबा दिसूनही त्याची विक्री पुरेशा प्रमाणात होत नव्हती. मे महिन्याच्या पहिल्याच सप्ताहात मोठ्या प्रमाणावर दाखल झालेल्या आंब्यांमुळे सातारकरांच्या घरात आमरसाचा बेत सुरू होईल.

साताऱ्याच्या बाजारपेठेत आज पहिल्यांदाच एवढी मोठी आवक झाली. कोकण, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश येथील आंब्यांची आवक झाली आहे. याचे दर घाऊक बाजारात २५० रुपयांपासून ३५० रुपयांपर्यंत आहेत. सकाळी स्टॉलवर आंबा लावल्यानंतर खरेदीसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.- इकबाल बागवान, फळ विक्रेता, राजवाडा.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMangoआंबा