शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कळंबीत बेकरी व्यावयायिकाचा खून,धारदार शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 16:26 IST

औंध : पुसेसावळी-रहिमतपूर रस्त्यावर कळंबी, ता. खटाव येथे बुधवारी रात्री अज्ञातांनी धारदार शस्त्राने बेकरी व्यावसायिकावर वार करून खून केल्याची ...

ठळक मुद्देकळंबीत बेकरी व्यावयायिकाचा खून,धारदार शस्त्राने वार हल्लेखोरांचे पलायन, संशयितांच्या शोधार्थ पथके रवाना

औंध : पुसेसावळी-रहिमतपूर रस्त्यावर कळंबी, ता. खटाव येथे बुधवारी रात्री अज्ञातांनी धारदार शस्त्राने बेकरी व्यावसायिकावर वार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. रविराज बाळकृष्ण लोखंडे (वय ४१, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) मृताचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, रविराज लोखंडे हे मागील काही वर्षांपासून औंध, पुसेसावळी परिसरात बेकरी प्रोडक्ट विकण्याचे काम करत होते. ते आपल्या वाहनातून फिरून बेकरी माल विकत असत. बुधवारी औंध परिसरातील गावांमध्ये माल विकून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी परतत होते.

ते टेम्पोने रहिमतपूरकडे निघाले असता कळंबीनजीकच्या एका दूध डेअरीजवळ अज्ञातांनी त्यांचे वाहन अडवले. धारदार शस्त्राने वार करून हल्लेखोरांनी पलायन केले. या हल्ल्यात रविराज लोखंडे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळाताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन जखमी लोखंडे यांना औंध ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात सुनील लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे.

घटनास्थळी उपविभागीय अधिकारी बी. बी. महामुनी यांनी भेट दिली आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर करीत आहेत.हल्ल्यामागील कारण अस्पष्टरात्री साडेआठच्या सुमारास दोन दुचाकींवरून पाच हल्लेखोर आले. त्यांनी लोखंडे यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा मोबाईल व गाडीची चावी लांबवली. मात्र, रोख रकमेची पिशवी गाडीत जशीच्या तशी ठेवून पुसेसावळीच्या दिशेने पलायन केले. खुनामागील कारण अस्पष्ट असून, पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी