शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

खटाव तालुक्यात कोरोनाबाधितांनी ओलांडला सतरा हजारांचा पल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : लॉकडाऊन करायचा की नाही या निर्णयापर्यंत राज्य सरकार पुन्हा आले असतानाच राज्यातील वाढती कोरोनाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : लॉकडाऊन करायचा की नाही या निर्णयापर्यंत राज्य सरकार पुन्हा आले असतानाच राज्यातील वाढती कोरोनाची आकडेवारी आणि जनतेचा हलगर्जीपणा यामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केला होता. पण तरीदेखील कोरोनाचे युद्ध संपलेले नाही. खटाव तालुक्यातही कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७ हजार १४९ झाली आहे. तरीही अनेक मंडळी निष्काळजीपणे वावरत असून अनेकांचे मास्क गळून पडले आहेत.

कोरोनावर लस आली हाच तो काय मागील वर्षात मिळालेला दिलासा होता. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाने सर्व ते प्रयत्न करून पाहिले. सध्याची आकडेवारी पाहता आता ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. सरकार, प्रशासन आणि रुग्णालये तेथील कर्मचारी त्यांचे काम तेव्हाही करत होते. आजही करत आहेत. त्यातून त्यांना उसंत मिळणार नाही अशीच स्थिती आहे. कोरोनाला हरवायचे असेल तर नियमांचे काटेकोर पालन करणे हाच एकमेव उपाय आहे. लॉकडाऊनला लाखोली वाहिली जात असेल आणि सरकारच्या नावाने बोटे मोडली जात असतील तरी नियमाचे पालन करणे हाच कोरोनाचा प्रसार थांबवण्याचा उपाय असल्याचे सत्य नाकारता येणार नाही.

आताही दोन दिवसांपासून रूग्णसंख्येत वाढ होण्यास सुरुवात झालेली दिसू लागली होती. पहिल्या लाटेच्या वेळी काही त्रुटी निश्चीत होत्या. त्यावेळी सुविधा नव्हत्या. या महामारीची पूर्ण माहिती नव्हती. मात्र आता तसे नाही, सुविधा असल्या तरी रुग्णवाढ होऊ लागली. तरीही कोणाचा विश्‍वास बसणार नाही इतका बिनधास्त कारभार सगळीकडेच सुरू आहे. प्रत्येक बाब सरकार आणि प्रशासन यांच्यावर टोलवताना नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आणि कर्तव्ये असतात याचे समाजभान ठेवले गेले नाही. टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली जात होती तेव्हा समजून घेणे आवश्‍यक होते. या काळात सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल्स, बार एवढेच नव्हे तर चौक आणि मुख्य बाजारपेठांचे रस्ते सगळेच गजबजलेले होते. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी असणारा मास्क गायबच झाला होता. सामाजिक अंतर कधीच मिटले आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत गेली.

चौकट

४७० जणांनी गमावला जीव

खटाव तालुक्यात आजअखेर १७ हजार १४९ बाधित रुग्ण होते. त्यापैकी १५ हजार ६७७ रुग्ण बरे झाले आहेत. या काळात ४७० जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या तालुक्यात १ हजार सात बाधित रुग्ण असून कोरोना केअर सेंटरला १०५, कोरोना सेंटरला १५६, खासगी दवाखान्यात ३३, होम आयसुलेशनमध्ये ५५९ तर १५७ स्कूल आयसुलेशनमध्ये आहेत. वडूज शहरातील पन्नास बाधित रुग्ण दगावले आहेत. सध्या‌ शहरात पंचवीस बाधित रुग्ण आहेत.

फोटो

२५वडूज

खटाव तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी चौकाचौकांत गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. (छाया : शेखर जाधव)