शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बँकांची कोंडी : खरीप नियोजन लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 22:22 IST

नितीन काळेल । सातारा : कोरोनाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला असून, बळीराजालाही खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेताना अडथळ्यांचा सामना ...

ठळक मुद्देउद्दिष्टाच्या अवघ्या १७ टक्के पीक कर्जाचे वाटप

नितीन काळेल ।सातारा : कोरोनाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला असून, बळीराजालाही खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेताना अडथळ्यांचा सामना करावा लागतोय. एकीकडे बँका कर्जवाटपासाठी सज्ज असल्यातरी शेतकरी लॉकडाऊनमुळे तिथपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे बँकांना २ हजार २७० कोटींचे टार्गेट असलेतरी आतापर्यंत फक्त ३७६ कोटी रुपये वाटप झाले आहे. हे प्रमाण अवघे १७ टक्के आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र साडेतीन लाख हेक्टरहून अधिक आहे. यामध्ये भात, सोयाबीन, बाजरी, भुईमूग अशी महत्त्वाची पिके घेण्यात येतात. खरीप हंगामासाठी शेतकरी विविध बँका, सोसायट्यांकडून कर्ज घेतो. त्यानंतर या कर्जाची फेडही होते. दरवर्षी एप्रिलपासून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यास प्रारंभ होतो. सप्टेंबर अखेरपर्यंत खरीप हंगामाचा कर्ज पुरवठा होतो. त्यासाठी विविध बँकांना उद्दिष्टही देण्यात येते. यंदाच्या खरीप हंगामासाठी एप्रिल ते सप्टेंबर या काळासाठी जिल्ह्यातील जवळपास ३५ बँकांना २ हजार २७० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.

त्यापैकी ११०० कोटींचे उद्दिष्ट हे जिल्हा बँकेला आहे. आतापर्यंत सर्व बँकांनी मिळून ३७६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप शेतकऱ्यांना केलेले आहे. यामध्ये जिल्हा बँकेने सर्वाधिक ३५७ कोटी रुपयांचे वाटप शेतकºयांना केलंय. सरासरी पाहिली तर आतापर्यंत फक्त १७ टक्केच कर्ज वाटप झालेले आहे. तर ७४ हजार ७९८ शेतकºयांनी पीक कर्ज घेतलेले आहे.कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असल्याने बहुतांशी शेतकºयांना बँकांपर्यंत पोहोचताच येत नाही. त्यातच विविध कागदपत्रेही लागतात. अशा प्रकारामुळे खरीप हंगामासाठी कर्ज मिळविताना शेतक-यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. कोरोनाचे संकट दूर होत नाही, तोपर्यंत बळीराजाची ही परवड सुरूच राहणार आहे.

कारण, एकीकडे बँका खरीप हंगामासाठी कर्ज देण्यास सज्ज असताना बळीराजाला गावच सोडता येत नाही. त्यातच बँकांमध्येही पैसे काढणे आणि भरणे अशीच कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसते. कर्ज विभाग हा तात्पुरताच सुरू असतो. त्यामुळे कोरोना विषाणूचे संकट कमी झाल्यानंतरच बळीराजाची पावले बँका, सोसायट्यांकडे वळतील, अशी सद्य:स्थिती आहे.

 

जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी बँकांना २२७० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ७४ हजारांवर शेतकऱ्यांना ३७६ कोटींचे वाटप झालेले आहे. कोरोना स्थितीमुळे वाटपाचे प्रमाण कमी आहे. बँकांनीही मेळावे घेऊन शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्जपुरवठा करून उद्दिष्टपूर्ती करावी.- महादेव शिरोळकर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक. बँक आॅफ महाराष्ट्र

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरी