कऱ्हाड : धोकादायक पद्धतीने वाहने अडवून दररोज खिसे गरम करणाऱ्या ‘खाकी’ची शनिवारी ‘हवा टाईट’ झाली. पोलीस कर्मचाऱ्यांची रस्त्यावरील दुकानदारी ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले. शनिवारी दिवसभरात पोलिसांचा एकही कर्मचारी ‘हायवे’वर वसुलीसाठी थांबल्याचे दिसला नाही. दरम्यान, ‘लोकमत’ने या खाबूगिरीला वाचा फोडल्यामुळे ‘एनएसयूआय’चे जिल्हाध्यक्ष अमित जाधव यांच्यासह विविध संघटनांनी ‘लोकमत’चे आभार मानले. तसेच हा प्रकार पुन्हा निदर्शनास आल्यास वरिष्ठांकडे याबाबत तक्रार करून त्याचा पाठपुरावा करणार असल्याचेही ‘एनएसयूआय’च्या पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मालखडे, वाठारपासून उंब्रज, काशीळपर्यंत महामार्ग पोलिसांनी अक्षरश: वाहनधारकांचा पिच्छा पुरविला होता. महामार्ग पोलीस ठिकठिकाणी थांबून धोकादायक पद्धतीने वाहने अडवीत होते. त्यांच्या या खिसे भरण्याच्या पद्धतीमुळे अपघाताचा धोका होता. तसेच वाहनधारकांना नाहक आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत होता. या प्रकारावर शनिवारी ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. ‘जाऊ तिथे खाऊ... मग हायवे का सोडू ?’ या मथळ्याखाली शनिवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच महामार्गावर वसुली करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवसभर चौकी सोडली नाही. महामार्गाकडे हे कर्मचारी फिरकलेच नाहीत. तसेच वरिष्ठांकडूनही या कर्मचाऱ्यांची कानउघाडणी झाल्याचे समजते. मात्र, ‘चोरीचा मामला’ असल्याने याबाबत कोणताही कर्मचारी भाष्य करायला तयार नाही. महामार्गावर ठिकठिकाणी पोलिसां-ंकडून केली जाणारी ही लूट बेकायदेशीर व धोकादायक होती. (पान १० वर) असल्याने याबाबत कोणताही कर्मचारी भाष्य करायला तयार नाही. महामार्गावर ठिकठिकाणी पोलिसांकडून केली जाणारी ही लूट बेकायदेशीर व धोकादायक होती. पोलीस कर्मचारी वेगात निघालेल्या वाहनाच्या अचानक आडवे जायचे. त्यामुळे चालकाला वाहन नियंत्रित करून रस्त्याकडेला घेण्यासही वेळ मिळत नव्हता. संबंधित चालकाने अचानक ब्रेक दाबल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या चालकांचीही वाहन नियंत्रित करताना कसरत व्हायची. तसेच या प्रकारामुळे भीषण अपघाताचीही शक्यता निर्माण व्हायची. संबंधित प्रकाराबाबत एखाद्या वाहनधारकाने पोलिसांना जाब विचारल्यास त्यालाच पोलीस कर्मचारी फैलावर घ्यायचे. परिणामी, तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी वाहनधारकांची अवस्था व्हायची. अखेर ‘लोकमत’ने हा प्रकार उजेडात आणल्यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’च्या दणक्याने ‘खाकी’ गायब; हायवे ‘रिलॅक्स’
By admin | Updated: November 29, 2015 00:43 IST