शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Satara: आम्हालाही जगायचंय, स्वच्छ हवा-पाणी हवं; केसुर्डी ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे 

By नितीन काळेल | Updated: January 25, 2024 18:04 IST

प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईसाठी अर्धनग्न मोर्चा 

सातारा : शासनाने आमच्या जमिनी काढून घेतल्या आणि तेथे कंपन्या आणल्या. आम्हाला जगायचंय, स्वच्छ पाणी आणि हवा पाहिजे. जमिनीत केमिकल नको. तुम्हाला वाटत असेल आम्ही जगायला नको, तर मरायलाही तयार आहे. यासाठी तुम्ही बघायला यावं, असे साकडे प्रशासनाला घालत केसुर्डी ग्रामस्थांनी प्रदूषण करणाऱ्या एमआयडीसीतील कंपन्यावर कारवाईची मागणी केली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला.खंडाळा तालुक्यातील केसुर्डी एमआयडीसीतील इलजीन ग्लोबल इंडिया आणि ओरिएंटल इस्ट या कंपन्यांमधील रसायनयुक्त दुर्गंधीमुळे शेती, पशुधनासह मानवी आरोग्यास हानी पोहोचत आहे. या कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. तरीही प्रशासनाकडून कोणतीच पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने गुरुवारी केसुर्डी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.कंपन्यांमधून बाहेर टाकण्यात येणारी रसायनयुक्त राख व केमिकलची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. मागील अनेक वर्षांपासून हजारो टन राख खड्डे काढून त्यात गाडण्यात येत आहे. तसेच रासायनिक द्रवेही याच खड्ड्यांमध्ये सोडण्यात येत आहेत. हे घटक जमिनीत मिसळत आहेत, त्याचा अंश भूगर्भात जात आहे. या कंपन्यांतून निघालेल्या टाकाऊ रासायनिक द्रव्याची अवैधरित्या विल्हेवाट लावण्यात येत आहे. त्यामुळे केसुर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यातील रासायनिक घटक जमिनी व जलसाठ्यांमध्ये आढळून येत आहेत.मानवी आरोग्यासही ते घातक ठरत आहेत. या कंपन्यांकडून शासनाच्या प्रदूषणाबाबतच्या निकषांची पायमल्ली केली जात आहे. याबाबत प्रदूषण नियामक मंडळाकडे वारंवार तक्रार देऊनही संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे. याबाबत योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केसुर्डी ग्रामस्थांनी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीही केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMIDCएमआयडीसीpollutionप्रदूषण