शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पतंगबाजीत नजर हटी दुर्घटना घटी! सातारा इमारतीच्या टेरेसवर चिमुकल्यांच्या थरारक कसरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:05 IST

सातारा : उंच इमारतीवर मुलांची पतंगबाजी पालकांची डोकेदुखी ठरत आहे. टेरेसवर आपल्याच नादात खेळण्यात व्यस्त असणाºया चिमुकल्यांचा हा खेळ पालकांच्या जिवाला घोर लावणारा ठरतोय.

ठळक मुद्देधोकादायक स्टंट ठरतायत जीवघेणेपालकांच्या या सूचनांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून ही पतंगबाजी होते

सातारा : उंच इमारतीवर मुलांची पतंगबाजी पालकांची डोकेदुखी ठरत आहे. टेरेसवर आपल्याच नादात खेळण्यात व्यस्त असणाºया चिमुकल्यांचा हा खेळ पालकांच्या जिवाला घोर लावणारा ठरतोय. ‘नजर हटी दुर्घटना घटी’ अशी प्रतिक्रिया उंच इमारतीवर खेळणाºया मुलांकडे बघून दिली जाते.

मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी केली जाते. पण सध्या बाजारपेठेत पतंग दाखल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये पतंग उडविण्याची चुरसच लागली आहे. सकाळी शाळेतून आल्यानंतर दुपारच्या टप्प्यात गटाने टेरेसवर जाऊन हा खेळ सुरू होतो. इमारतीवर असलेल्या सर्वांत उंच ठिकाणी चढून मुलं पतंग उडवतात. या छोट्याशा जागेत त्यांच्याबरोबर त्यांचे मित्रही असतात. पतंग उडविण्याच्या नादात उंचावरून तोल गेला किंवा पाय घसरला तर मोठी दुर्घटना घडू शकते.

पतंग उडवणाºया या शालेय मुलांना खेळताना धोक्याचे भान राहत नाही. खेळायचं म्हणजे जिंकायचं या एकाच उद्देशाने देहभान विसरून ते खेळण्यात दंग होतात. त्यामुळे अपघात आणि त्याचे दुष्परिणाम हे विषय त्यांच्या गावीही नसतात. या संभाव्य धोक्यांची जाणीव असल्यामुळे पालक याविषयी सूचना करत असतात; पण पालकांच्या या सूचनांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून ही पतंगबाजी होते. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर न भरणारे नुकसान होण्यापेक्षा वेळेत या मुलांना सावध करून या धोकादायक ठिकाणांपासून परावृत्त करणे गरजेच आहे. धोकादायक पद्धतीने पतंगबाजी करणाºया मुलांना बघेल त्याने हटकण्याची गरज निर्माण झाली आहे.चायनीज मांज्याची छुपी विक्री!फलटण तालुक्यात चायनीज मांज्यामुळे एक जणाला प्राण गमवावा लागला होता. तेव्हापासून या मांज्यावर साताºयात बंदी होती. पण पतंग काटायला उत्कृष्ट असलेल्या या मांजाची छुप्या पद्धतीने आणि चढ्या दराने विक्री केली जात असल्याची माहिती उजेडात आली आहे. माणसांसह पक्ष्यांसाठी धोकादायक असलेला हा मांज्या विक्रीसाठी ठेवणाºयांवर कारवाईची मागणी होत आहे.कटी पतंग धोक्याचीच!उंच इमारत, झाडे, विद्युत खांब, टॉवर यांपैकी कुठेही जाऊन ही पतंग अडकते. पतंग पटकवण्याच्या एकाच उद्देशाने ही मुलं वाट्टेल ते धोके पत्करायला तयार असतात. पडक्या इमारतीवर चढणे, घरावरून विद्युत खांबावरील पतंग काढणे, झाडावर चढून मांज्याचा गुंता सोडवणे हे प्रकार मुलांकडून केले जातात. पाच आणि दहा रुपयांची पतंग पुन्हा देण्याची ऐपत पालकांची असते; पण केवळ इर्ष्येपोटी पतंग काढण्यासाठी धोके पत्करतात.नजर वर, भिरकीट खाली!पतंगबाजी करताना पतंग उंच उडविण्यापेक्षा ती काटण्याकडे मुलांचा कल अधिक असतो. काटलेली पतंग मिळवणं त्यांच्यासाठी ‘प्रेस्टीज पॉर्इंट’ असतो. म्हणून आकाशात नजर आणि भिरकीट पळापळ यांची योग्य कसरत करून ही पतंग पटकवायची असते. पतंग कापणं म्हणजे हरवणं, पतंग लुटणं म्हणजे शौर्य या असल्या भन्नाट कल्पनांनी प्रभावीत होऊन ही चिमुरडी पतंगामागे रस्त्याने सुसाट पळत असतात.साताºयात इमारतींच्या टेरेसवरील पाईपच्या आधाराने मुलांचे असे चढणे जीवघेणे ठरू शकते.

टॅग्स :children's dayबालदिनSatara areaसातारा परिसर