शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

काश्मिरला पॅकेजची गरज नसून विश्वासाच्या मायेची फुंकर हवी : नलावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 14:22 IST

कलम ३७० व ३५ अ या भारतीय राज्यघटनेतील हंगामी तरतुदी होत्या. मात्र त्याचा प्रभाव संपुष्टात आला आहे. काश्मिरला भारताच्या मूळ प्रवाहाशी जोडण्याकरता पॅकेजची गरज नाही तर त्यांच्या दु:खांवर विश्वासाच्या मायेची फुंकर घालणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विमा कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड वसंतराव नलावडे यांनी केले.

ठळक मुद्देकाश्मिरला पॅकेजची गरज नसून विश्वासाच्या मायेची फुंकर हवी : नलावडे साताऱ्यातील स्मृती व्याख्यानमालेत वक्तव्य

सातारा: कलम ३७० व ३५ अ या भारतीय राज्यघटनेतील हंगामी तरतुदी होत्या. मात्र त्याचा प्रभाव संपुष्टात आला आहे. काश्मिरला भारताच्या मूळ प्रवाहाशी जोडण्याकरता पॅकेजची गरज नाही तर त्यांच्या दु:खांवर विश्वासाच्या मायेची फुंकर घालणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विमा कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड वसंतराव नलावडे यांनी केले.इस्माईल साहेब मुल्ला विधी महाविद्यालयाच्या अ‍ॅड. व्ही. एन. पाटील स्मृती व्याख्यानमालेचे तिसावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या सुजाता पवार, क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कॉ किरण माने, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके, प्रख्यात विधिज्ञ अ‍ॅड. धैर्यशील पाटील, अ‍ॅड प्रवीण देशपांडे, आनंद ओक उपस्थित होते.

'कॉ नलावडे म्हणाले, काश्मीर हे राज्य भारताचेच आहे. त्यामुळे सर्वांनी मनातील गोंधळ दूर करा. काश्मीर राज्यात शांततापूर्ण परिस्थिती आहे. केवळ श्वास घेण्याइतपत स्वातंत्र्य आहे. पुढील योजनांच्या अंमलबजावणीचा तपशील केंद्र सरकारकडे आहे.

४ आॅगस्टला केंद्राकडून ज्या पद्धतीने राजकीय पध्दतीने हालचाली सुरू होत्या. त्यानुसार राज्यात काहीतरी मोठ्या हालचाली घडणार हे अपेक्षित होते. भारतीय जीवन पध्दतीच्या मूळ प्रवाहाशी काश्मिरी लोकांचे मनोमिलन घडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्नांची गरज आहे. मात्र कायदा आणि मनोमिलन या दोन स्वतंत्र व दोन धृवावरच्या गोष्टी आहेत.कॉम्रेड वसंतराव नलावडे पुढे म्हणाले, गेल्या एकोणतीस वर्षात काश्मीरमधून बेचाळीस हजार काश्मिरी पंडितांचे विस्थापन झाले. त्यामुळे १९५२ च्या दिल्ली करारातील जनमताचा मुद्दा आता कालबाह्य ठरला आहे. प्रत्येक वेळी ३७० च्या आडोशाने राजकीय अगतिकतेचा संभ्रम वारंवार तयार करण्यात आल्याने काश्मिरी जनता अतिरेकी व राज्यकर्ते यांना वैतागली आहे.

काश्मिरी लोकांना पॅकेजची गरज नाही तर त्यांना रोजगार, शिक्षण, सुरक्षितता यांचा विश्वास देण्याची गरज आहे. काश्मीरची अर्थव्यवस्था सफरचंदाच्या बागावर अवलंबून आहे. येथे तीन महिने हंगाम असतो त्या हंगामातील रोजगाराला संधी मिळाली नाही तर प्रचंड उद्रेक होण्याची भीती नलावडे यांनी व्यक्त केली.काश्मीर प्रश्न हा भारताचा अंर्तगत प्रश्न आहे, हे विकसित देशांनी मान्य केले आहे. मात्र जागतिक पातळीवर अति भांडवलशाही अर्थव्यवस्था निर्माण झाल्याने ही मान्यता किती काळ टिकेल, याची शाश्वती नाही. लोकशाहीचा नागरिक भांडवलशाही अर्थव्यवस्थेत ग्राहक झाला आहे. त्यामुळे सामान्यांचा आवाज येथे ऐकला जाणार नाही. ती परिस्थिती काश्मीरमध्ये येऊ नये याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे नलावडे यांनी सांगितले.अ‍ॅड प्रवीण देशपांडे, व आनंद ओक यांनी यावेळी विचार व्यक्त केले. प्राचार्य सुजाता पवार यांनी प्रास्तविक केलेपोलिसांकडून नोटीस..भारतीय राज्यघटना व ३७० कलम या विषयावर अ‍ॅड. वसंतराव नलावडे यांच्या व्याख्यानाला भाजपच्या कार्यकत्यार्नी आक्षेप घेतला होता. कायदा व सुव्यवस्थेचा भाग म्हणून इस्माइल मुल्ला लॉ कॉलेजच्या महाविद्यालयात शहर पोलीस ठाण्याचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

शहर पोलिसांनी नलावडे यांना १४९ ची नोटीस बजावली होती. महाविद्यालय व्यवस्थापनानेही परिस्थिती संयमाने हाताळली. भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, अमीत कुलकर्णी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनीही व्याख्यानाला उपस्थिती दर्शविली. कोणताही अनुचित प्रकार न घडता व्याख्यान पार पडले.

टॅग्स :Article 370कलम 370Satara areaसातारा परिसरcollegeमहाविद्यालय