शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

कास-ठोसेघरला पर्यटकांचा बहर!

By admin | Updated: July 27, 2015 23:02 IST

ऊन-पावसाचा खेळ : छोट्या-छोट्या धबधब्यांमध्ये भिजण्याचा लुटला मनसोक्त आनंद

सातारा : निसर्गाची मुक्त उधळण, सर्वदूर पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा, कोसळणारा जलप्रपात अन् धुक्यात हरवून गेलेली रानवाट. कधी ऊन तर कधी पावसाची रिमझिम असे रम्य वातावरण अनुभवण्याऱ्या पर्यटकांचा जणू कास-ठोसेघरच्या निसर्गरम्य ठिकाणी बहरच आला आहे.सलग आलेल्या सुट्यांमुळे कास, ठोसेघर, सज्जनगड याठिकाणी पर्यटकांनी निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला. कास पठाराबरोबरच कास तलाव, ठोसेघर धबधबा, सज्जनगड या ठिकाणी पर्यटकांनी पावसाच्या सरी अंगावर झेलत निसर्गात भटकंती करण्याचा मनसोक्त आनंद लुटला. सज्जनगड येथे आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे गडाला यात्रेचे स्वरूप आले होते.साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम असल्याने ठोसेघरचा धबधबा सुमारे १२०० फुटांवरून ओसंडून वाहत आहे. शनिवार, रविवार आणि आषाढी एकादशीनिमित्त सोमवारीही सुटी मिळाल्यामुळे तीन दिवस याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.ठोसेघर, चाळकेवाडी पठार, चिखली, पांगारे येथील भातशेती, पांगारे धरण परिसरातही पर्यटकांनी निसर्ग भटकंतीचा आनंद घेतला. उरमोडी धरण, सांडवली धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ लागली होती. निसर्गाचा आविष्कार अनेकांनी आपल्या मोबाईल, कॅमेऱ्यात टिपून घेतला. तर काहींनी मनसोक्त धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटला.पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, नागपूर तसेच कर्नाटक राज्यातूनही पर्यटकांनी हजेरी लावली होती. बोरणे घाट, यवतेश्वर घाटात छोटे-छोटे धबधबे कोसळत आहेत. यामध्ये चिंब भिजण्याचा आनंद पर्यटकांनी लुटला. (प्रतिनिधी)