शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कराड 'दक्षिण' -'उत्तर' काँग्रेसची तोंडे 'पूर्व'- 'पश्चिमे'ला ! घडतंय- बिघडतंय : 'सह्याद्री'च्या निवडणुकीत एकवाक्यता दिसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 23:29 IST

कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक पँनेल रिंगणात असताना काँग्रेसची इतर काही मंडळी मात्र  इतरांना पाठिंबा देताना दिसत आहेत.

प्रमोद सुकरे

यशवंतनगर (ता. कराड ) : येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ एप्रिल रोजी होत आहे. त्यासाठी प्रचाराची रणधुमिळी सुरू आहे. मात्र या निवडणुकीत कराड दक्षिण उत्तर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तोंडे पूर्व- पश्चिमेला दिसत आहेत. कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक पँनेल रिंगणात असताना काँग्रेसची इतर काही मंडळी मात्र  इतरांना पाठिंबा देताना दिसत आहेत.

अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यंदा तिरंगी होत आहे. त्यात सत्ताधारी कारखान्याचे अध्यक्ष व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब पाटील यांचे एक पॅनेल रिंगणात आहे. त्या विरोधात भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांनी स्वतंत्रपणे पँनेल उभे केले आहे. त्याला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटील यांच्या गटाचा पाठिंबा आहे. तर काँग्रेसचे कराड उत्तर अध्यक्ष निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली अजून एक तिसरे पँनेल रिंगणात असून त्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व भाजप किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांचा पाठिंबा आहे.त्यामुळे सगळी भेळमिसळ झाली आहे.

कराड तालुका हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण त्याच  तालुक्यातील परिस्थिती आता बदलली आहे. कराड दक्षिण व उत्तर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात नुकतेच भाजपचे कमळ फुलले आहे. अशावेळी बॅक फुटल्या गेलेल्या काँग्रेसने एकजुटीने राहणे आवश्यक असताना सार्वजनिक निवडणूक वेगळी अन सहकारातील निवडणूक वेगळी अशी पळवाट काढत काँग्रेसच्या नेत्यांनी सह्याद्रीच्या निवडणुकीत घेतलेल्या सोयीच्या भूमिका  सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना मात्र पटलेल्या दिसत नाहीत.भरीस भर म्हणून ...

मुळातच काँग्रेसचे दोन गट वेगळे झाले असताना आता भरीस भर म्हणून कराड दक्षिण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी एक मेळावा घेत विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या पी.डी पाटील पँनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यात माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंत जगताप,माजी पंचायत समिती सदस्य,उद्योजक नामदेव पाटील अन् कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांचे बंधू संदिप शिंदे आदिंचा समावेश आहे.त्यामुळे दक्षिण मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात यांना थेट विरोधच केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब काँग्रेस कार्यकर्त्यांना निश्चितच चिंतन करायला लावणारी आहे.

उत्तर मधीलही अनेकजण विरोधात 

कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात यांनी 'सह्याद्री'च्या निवडणुकीत पँनेल उभे ठाकले आहे. पण त्यांच्या कार्यक्षेत्रातील म्हणजेच कराड उत्तर मतदार संघातील सुध्दा सगळी काँग्रेस त्यांच्या सोबत दिसत नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटिचे प्रदेश प्रतिनिधी अजितराव पाटील चिखलीकर तर त्यांच्याविरोधातील पॅनेलच्या व्यासपीठावर जाहीर सभा ठोकत आहेत.तर इतर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी यांनी देखील पी डी पाटील पँनेलला पाठिंबा दिल्याचे दिसत आहे.