शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

पाणीदार गावासाठी रणरागिणींच्या हाती कुदळ अन फावडे

By admin | Updated: April 17, 2017 13:01 IST

भोसरे ग्रामस्थ एकवटले : श्रमदानातून पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याचा केला निर्धार

आॅनलाईन लोकमतखटाव (जि. सातारा), दि. १७ : श्रमदानातून एकीच्या बळावर गावाचा कायापालट करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून भोसरे गावाने वॉटर कप स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत असतानाच केवळ स्पधेर्पुरते या कामाकडे न बघता आपल्या पुढील पिढीला या कामातून अधिकाधिक फायदा कसा घेता येईल या दृष्टीने काम करण्याचा निर्धार केला आहे. उन्हाचा विचार न करता पावसात पडणाऱ्या पाण्याचा एक न एक थेंब अडविण्यासाठी आणि गाव पाणीदार करण्यासाठी हजारो हात न थकता राबत आहेत.पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना दृढ होत असताना शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. त्याचबरोबर पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पधेर्तूनही गावागावातून जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. दुष्काळी हा शब्द पुसून टाकण्यासाठी सध्या बऱ्याच गावांतून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. भोसरे गावाने एकजुटीच्या माध्यमातून वॉटर कप स्पधेर्साठी कंबर कसली आहे. आपापसातील मतभेद विसरून गावाच्या विकासासाठी सर्वांना एकत्र आणण्याचे काम या गावचे सुपुत्र कुलाबा तहसीलदार पदावर कार्यरत असणारे विश्वास गुजर यांनी केले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरे गावातील आबालवृद्धांसमवेत मोठ्या संख्येने महिला वर्ग या कामासाठी श्रमदान करण्याकरिता बाहेर पडला आहे. गावातील सर्व बचत गट, महिला मंडळ तसेच महिला संघटनांचा सहभाग लक्षणीय आहे. हातात कुदळ, फावडे तसेच पाटी घेऊन कामाला लागल्यामुळे ज्यामुळे आता या कामाला वेगळीच दिशा प्राप्त झाली आहे. श्रमदानाचे महत्त्व तसेच लोकसहभाग असल्याशिवाय कोणतेच काम उठावदार होऊ शकत नाही आणि म्हणूनच भोसरे गावाने एकसंधतेच्या जोरावर ही स्पर्धा सर करण्याचा निश्चय केला आहे. (वार्ताहर)बंधारे गाळमुक्त, ओढ्यांचे खोलीकरणगावकऱ्यांच्या श्रमदानातून मनुष्यबळाद्वारे मृदा व जलसंधारणाची कामे करत असतानाच शोषखड्डे, बांधावर वृक्षलागवड करण्याचे काम सुरू आहेत. जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढणे, माती बांध घालणे, समतोल चर काढणे, जुन्या विहिरी तसेच ओढ्याची दुरुस्ती व खोलीकरण करणे आदी कामांनी गती घेतली आहे. गावातील सुमारे एक हजार महिला, पुरुष, युवक, युवती तसेच त्यांच्या समवेत गावातील विविध पदांंवर कार्यरत असलेले पदाधिकारी एकत्र येऊन श्रमदान करीत आहेत.