शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कासला वेध फुलोत्सव बहराचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश झालेल्या कास पठारावर तृण, कंद, वेली, आर्किड फुलांचा हंगाम सुरू झाल्याने पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळू लागली आहेत. तसेच कास पठार, तलाव परिसरात अल्हाददायक वातावरण असल्याने पर्यटक निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत असून सुटीच्या दिवशी कास पठार परिसरात पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी ...

लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश झालेल्या कास पठारावर तृण, कंद, वेली, आर्किड फुलांचा हंगाम सुरू झाल्याने पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळू लागली आहेत. तसेच कास पठार, तलाव परिसरात अल्हाददायक वातावरण असल्याने पर्यटक निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत असून सुटीच्या दिवशी कास पठार परिसरात पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी होताना दिसत आहे.शहराच्या पश्चिमेस आंतरराष्ट्रीय जैवविविधता तसेच दुर्मीळ फुलांमुळे जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या कास पठाराची ओळख प्रमुख पर्यटनस्थळापैकी एक होय. कास पठारावर चवर, टुथब्रश, कापरू, पंद, पाचगणी आमरी, भुईचक्र, आदी फुले तुरळक प्रमाणात उमलण्यास सुरुवात झाली आहे. पठारावरील नयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी जिल्ह्यासह परराज्यातून फुलांचा हंगाम सुरू झाल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या पठाराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जून ते आॅक्टोबर महिन्यादरम्यान तृण, कंद, वेली तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतीना अत्यंत आकर्षक अशा निळया, जांभळ्या, लाल, पांढºया रंगांची फुले येतात. मध्य आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात विविधरंगी दुर्मिळ फुलांचे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात. या पठारावरील सुंदर विविधरंगी फुलांचा कालावधी आठ ते पंधरा दिवसांचा असतो.सध्या पांढºया रंगाची फुले तुरळक स्वरूपात येण्यास सुरुवात झाली असल्याने तसेच चोहोबाजूला हिरवागार निसर्ग, पावसाची सततची संततधार, गुलाबी थंडी यामुळे पर्यटक कुटुंबासमवेत दाट धुक्यासह पावसाळा ऋतूचा आनंद घेत आहेत.चवर (हिच्चीनीया कावलीना)ही वनस्पती सह्याद्रीच्या व कोकण रांगांमध्ये दिसते.आल्याच्या वगार्तील वनस्पती आहे. जमिनीत हळद किंवा आलेसारखे आकाराचे कंद दिसून येतात. याच कंदातून पठारावर पांढºया रंगांची फुले उमलतात. यास चवर किंवा चवेटा म्हणतात. पाने करदळीच्या पानांसारखी लांबट असतात.आषाढ बाहुली आमरी (हबेनारीया ग्रँडीफलोरीफलोरमीस) : ही वनस्पती जांभ्या खडकात मातीच्या भागात उगवते. याची पाने लहान आकाराची असतात. ती जमिनीलगत असतात. त्यावर देठ असून त्यामध्ये दोन ते तीन फुले येतात. पांढºया रंगांच्या या फुलांचा आकार सुबक बाहुलीसारखा दिसतो.टुथब्रश : या वनस्पतीला एकाच बाजूने पांढºया रंगांची फुले येतात. ती एखाद्या टूथब्रशच्या आकाराप्रमाणे दिसतात.पंद (पिंडा कोंकणांसीस) : बटाट्यासारखा कंद असून, त्यातून कोंब बाहेर येऊन षटकोनी आकाराची असते. पांढºया आकाराची फुले येतात. प्राणी, रानडुक्कर, सायाळ आदी तृणभक्षी या घेतात.कापरू: कड्याच्या ठिकाणी तसेच डबक्या शेजारी दगडावरील शैवालावर येत असून लाल रंगाची पुष्कळ फुले येतात. ही फुले पाहण्यासाठी लांबलांबून वनस्पती प्रेमी येत असतात.